Navaratri 2025 : ज्यांच्या विवाहात अडथळे त्यांनी पिवळी वस्तू अर्पण करा, पुण्यात देवीची आख्यायिका, भाविकांची गर्दी

Last Updated:

Pune Navaratri 2025 : शारदीय नवरात्रोत्सव सध्या देशभरात मोठ्या उत्साहात सुरू असून पुण्यातील देवी मंदिरांमध्येही भक्तांचा ओघ वाढला आहे. शुक्रवार पेठ परिसरातील ऐतिहासिक पिवळी जोगेश्वरी मंदिरात नवरात्रीच्या काळात विशेष भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.

+
News18

News18

पुणे: शारदीय नवरात्रोत्सव सध्या देशभरात मोठ्या उत्साहात सुरू असून पुण्यातील देवी मंदिरांमध्येही भक्तांचा ओघ वाढला आहे. शुक्रवार पेठ परिसरातील ऐतिहासिक पिवळी जोगेश्वरी मंदिरात नवरात्रीच्या काळात विशेष भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे. मंदिर परिसरात रोज सकाळ- संध्याकाळ भक्तांची मोठी गर्दी होत असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली दिसते.
सुमारे 200 ते 250 वर्षे जुनं असलेलं हे मंदिर पुण्यातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक मानलं जातं. देवीचा स्पटीक पिवळ्या रंगाचा असल्यामुळे या देवीला ‘पिवळी जोगेश्वरी’ असे नाव मिळाले. मंदिराबद्दल एक वेगळी धार्मिक मान्यता आहे. ज्या मुला-मुलींच्या विवाहात अडथळे येतात त्यांनी देवीला पिवळ्या वस्तू अर्पण कराव्यात, असे सांगितले जाते. असं केल्याने त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन लवकरच विवाह ठरतो, अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे.
advertisement
देवीची मूर्ती अष्टभुजा स्वरूपात असून देवींची तीन रूपे म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशी आहेत. विशेष म्हणजे मूर्ती तांदळाच्या स्वरूपात देखील दर्शविली जाते. नवरात्रीच्या काळात देवीला नऊ स्वरूपांमध्ये सजविले जाते आणि रोज वेगवेगळ्या रूपात दर्शन घडते. यामुळे भक्तांना दररोज नव्या रूपात दर्शन घेण्याचा अनुभव मिळतो.
advertisement
पुण्यातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये पिवळी जोगेश्वरी महत्त्वाचे स्थान आहे. काळी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी, तांबडी जोगेश्वरी आणि चतुरश्रुंगी या देवस्थानांचा समावेश या शक्तीपीठांमध्ये होतो. सर्व शक्तीपीठांना भेट देणे प्रत्येकाला शक्य नसल्याने भक्तांना पिवळी जोगेश्वरी मंदिर हे एक प्रमुख पर्याय ठरते.
advertisement
नवरात्रीच्या काळात येथे धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा, तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. भाविक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होतात. दिवसभर मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण पाहिला मिळते.
मंदिराचे पुजारी दिनेश कुलकर्णी म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवात भक्तांची मोठी गर्दी दिसत आहे. भाविकांच्या श्रद्धेमुळे मंदिराचे महत्त्व वाढत असून पिढ्यांपिढ्या या परंपरेचे जतन केले जाते. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांचे दर्शन भक्तांसाठी खास असते.
advertisement
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील पिवळी जोगेश्वरी मंदिर हे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाने उजळून निघाले असून, देवीच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या संख्येने पुण्याकडे धाव घेत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navaratri 2025 : ज्यांच्या विवाहात अडथळे त्यांनी पिवळी वस्तू अर्पण करा, पुण्यात देवीची आख्यायिका, भाविकांची गर्दी
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement