Abroad Tourists : परदेशी पर्यटनात भारत अव्वल, कोणत्या देशात पर्यटकांची गर्दी ?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
पुणे हे केवळ शिक्षण, उद्योग आणि संस्कृतीचे केंद्र नसून आता विदेश पर्यटनासाठीही महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. दरवर्षी लाखो पुणेकर सुट्टीसाठी किंवा व्यवसायानिमित्ताने विदेशात प्रवास करतात. पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची जवळीक असल्यामुळे लाखो पर्यटक दरवर्षी विदेशात पर्यटनासाठी जातात.
पुणे हे केवळ शिक्षण, उद्योग आणि संस्कृतीचे केंद्र नसून आता विदेश पर्यटनासाठीही महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. दरवर्षी लाखो पुणेकर सुट्टीसाठी किंवा व्यवसायानिमित्ताने विदेशात प्रवास करतात. पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची जवळीक असल्यामुळे लाखो पर्यटक दरवर्षी विदेशात पर्यटनासाठी जातात.ह्या बाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना अमेय गटने यांनी दिली.
पुणे शहराची लोकसंख्या जवळपास 75 लाख आहे.मात्र 75 लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरातून जवळपास सात ते आठ लाख लोक ही दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी जातात. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लाखो पर्यटन दरवर्षी प्रवास करतात. मात्र आता पुणे विमानतळावरून विदेशात जाण्यासाठी डायरेक्ट फ्लाईट्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या सिंगापूर दुबई आणि बँकॉक सारख्या शहरांमध्ये जाण्यासाठी पुणे विमानतळावरून फ्लाइट्स उपलब्ध आहेत.
advertisement
पर्यटकांमध्ये अधिक लोकप्रिय असलेल्या व्हिएतनाम, कंबोडिया, बाली, मॉरिशस, मालदीव आणि भूतान या सौंदर्याने नटलेल्या देशातसुद्धा पर्यटनासाठी जाऊ शकता.या सर्व ठिकाणी पर्यटनासाठी जाण्यासाठी मुंबईला न जाता पुण्यातूनच फ्लाईटची सुविधा आहे. तर अमेरिका,कॅनडा किंवा युरोप या ठिकाणी सुद्धा पर्यटक भेट देऊ शकतात. पूर्वेकडील देशाबद्दल विचार केला तर, ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड आणि जपान यापैकी कुठल्याही देशांमध्ये पर्यटनासाठी जायचं असेल तर पुण्यातून कनेक्टिंग फ्लाईट सुविधा आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 29, 2025 4:29 PM IST

