advertisement

Kolhapur: 'मला मित्रासारखं समज', विकृत प्राध्यापक सौरभ जोशीची अखेर हकालपट्टी, विद्यार्थिनीने दाखवला कोल्हापुरी हिस्का!

Last Updated:

प्राध्यापक सौरभ जोशीच्या संतापजनक कृत्यामुळे कोल्हापूरच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. अखेरीस या प्रकरणाची दखल के.आय.टी. इंजिनिअरिंग कॉलेज प्रशासनाने

News18
News18
ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी
कोल्हापूर: शिक्षक आणि विद्यार्थीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना कोल्हापूरमधून समोर आली आहे. कोल्हापूरमधील प्रसिद्ध असलेल्या केआयटी (KIT) इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून आता महाविद्यालयाने या विकृत प्राध्यापकाची हकालपट्टी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील असलेल्या  के.आय.टी. (KIT) इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हा संतापजनक प्रकार घडला होता. सौरभ जोशी असं या विकृत प्राध्यापकाचं नाव आहे. सौरभ जोशी याने मागील काही दिवसांपासून महाविद्यालयात शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केलं होतं. मला जवळच्या मित्रा सारखं समज असं म्हणत हा विकृत विद्यार्थिनीला त्रास देत होता. अखेरीस या विद्यार्थिनीने धाडस दाखवून पोलिसांमध्ये तक्रार दिली, त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला.
advertisement
प्राध्यापकाची हकालपट्टी
प्राध्यापक सौरभ जोशीच्या संतापजनक कृत्यामुळे कोल्हापूरच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. अखेरीस या प्रकरणाची दखल के.आय.टी. इंजिनिअरिंग कॉलेज प्रशासनाने प्राध्यापक सौरभ जोशीला निलंबित केलं आहे. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ मोहन वनरोट्टी यांनी माहिती दिली.
advertisement
काय आहे नेमकं प्रकरण?  
सौरभ जोशी हा विकृत प्राध्यापक आपल्या शिक्षकीपेशाच्या आड विद्यार्थिंनी वर्गात शिकवत असताना त्रास द्यायचा. तो  सिव्हील एन्व्हायरमेंटचा विभागप्रमुख होता. अभ्यासाच्या किंवा अन्य कामाच्या बहाण्याने तो विद्यार्थिनींना आपल्या केबिनमध्ये बोलावायचा. केबिनमध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेऊन तो विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करायचा, असं पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. या विकृत जोशीने ४ ते ५ विद्यार्थिनींना अशाच प्रकार त्रास दिला होता. पीडित तरुणी ही पंढरपूरमधील रहिवासी आहे. ती कोल्हापूरमध्ये शिकण्यासाठी आली होती.  २० जानेवारी रोजी आरोपी सौरभ जोशी हा पीडितेच्या वर्गात केमिस्ट्री विषय शिकवायला आला होता. यावेळी त्याने तरुणीवर प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर पीडितेला केबिनमध्ये बोलाावलं आणि समजूत घालण्याच्या बहाण्याने जवळ येण्याचा प्रयत्न केला.
advertisement
'मला जवळचा मित्र समज'
हा प्रकार इथंच थांबला नाही, जोशी याने पीडितेला मानसिक त्रासही दिला. कुणाशी मैत्री करून नको, मेसेज करत जा, व्यायाम करत जा, मला जवळचा मित्र समज,  'ट्रीट मी अॅज यूवर क्लोज फ्रेंड' असं म्हणत केबिनमध्ये मिठ्ठी मारण्याचा प्रयत्नही केला होता. त्यानंतर हा विकृत जोशी पीडिताला या ना त्या कारणाने केबिनमध्ये बोलवून त्रास द्यायचा. त्यामुळे हा त्रास असह्य झाल्यामुळे पीडितेने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. विकृत प्राध्यापक सौरभ जोशीविरोधात विनयभंग आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur: 'मला मित्रासारखं समज', विकृत प्राध्यापक सौरभ जोशीची अखेर हकालपट्टी, विद्यार्थिनीने दाखवला कोल्हापुरी हिस्का!
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement