advertisement

Nashik Crime: सिन्नरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण, 9 तासांतच पोलि‍सांनी लावला आरोपीचा छडा

Last Updated:

Nashik News: सिन्नर पोलिसांनी 24 तासाच्या आत अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली आहे.

News18
News18
नाशिक: सिन्नर पोलिसांनी 24 तासाच्या आत अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर कारवाई केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुला- मुलींना अपहरण केले जात असल्याची घटना सातत्याने घडत असल्याची माहिती मिळाली होती. पण आता अखेर सिन्नर पोलिसांनी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांकडून अल्पवयीन मुला- मुलींना अपहरण करत असलेल्या टोळीमध्ये आणखी किती जणं समाविष्ट आहेत, याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
24 तासात आरोपीला अटक
सिन्नर पोलिसांनी अपरहण झाल्यानंतर फक्त नऊ तासांत सिन्नरमधून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली आहे. तिला फसवणाऱ्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी बुधवारी (4 मार्च) रात्री 10 वाजता सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. कॉन्स्टेबल रवींद्र चिने, साई नागरे, महेंद्र खामकर आणि कॉन्स्टेबल चौधरी यांनी तपासात सक्रिय भूमिका बजावली. विशेष तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत.
advertisement
पोलिसांनी आरोपीला कशा ठोकल्या बेड्या?
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलि‍सांना माहिती मिळाली की, अपहरण करण्यात आलेली मुलगी पुणे जिल्ह्यातील हवेली तहसीलच्या परिसरातील शिवापूर गावातील असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच, पोलीस पथक रात्रीच घटनास्थळी रवाना झाले. अटकेच्या भीतीने आरोपी त्याच्या मोबाईल लोकेशनबद्दल खोटी माहिती देऊन पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. पण, पोलि‍सांनी गुरूवारी सकाळी 8 वाजता अचूक ठिकाणी छापा टाकला आणि त्याला अटक केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा अल्पवयीन मुला- मुलींना एकट्याने बाहेर सोडण्याविषयाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Crime: सिन्नरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण, 9 तासांतच पोलि‍सांनी लावला आरोपीचा छडा
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement