advertisement

तिसरं महायुद्ध अटळ, इराण-इस्रायलपासून झाली सुरुवात? बाबा वेंगांची जगाला धडकी भरवणारी भविष्यवाणी

Last Updated:

सध्या इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेला भीषण संघर्षामुळे जगातील सर्वात प्रसिद्ध भविष्यवेत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बल्गेरियन बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

News18
News18
Baba Vanga Prediction 2026 : जगातील सर्वात प्रसिद्ध भविष्यवेत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बल्गेरियन बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सध्या मिडल इस्टमधील इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेला भीषण संघर्ष आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतरची परिस्थिती पाहता, अनेकांना प्रश्न पडला आहे की खरोखरच तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे का? गेल्या काही दिवसांपासून मिडल ईस्टमधील तणाव सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर जगभर तिसऱ्या महायुद्धाची चर्चा सुरू झाली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या बातम्या आणि त्यानंतर इराणने केलेले शेकडो क्षेपणास्त्र हल्ले यामुळे परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे.
नेमकी परिस्थिती काय आहे?
इस्रायल आणि इराणमधील हा संघर्ष आता केवळ 'छुप्या युद्धा'पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट आमनेसामनेच्या लढाईत बदलला आहे. इराणचा ऑटोमिक इव्हेंट आणि मध्यपूर्वेतील वाढता प्रभाव रोखण्यासाठी इस्रायल आणि अमेरिकेने ही मोठी लष्करी कारवाई केली. इराणने प्रत्युत्तरात इस्रायलमधील शहरे आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. या युद्धामुळे भीती निर्माण झाली आहे.
advertisement
बाबा वेंगा यांची 2026 साठीची भविष्यवाणी
बाबा वेंगा यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी 2026 सालासाठी काही धक्कादायक भाकिते केली होती, जी सध्याच्या जागतिक परिस्थितीशी मिळतीजुळती असल्याचे मानले जात आहे. बाबा वेंगा यांच्या मते, 2026 मध्ये एका मोठ्या जागतिक युद्धाची सुरुवात होईल. विशेष म्हणजे, त्यांनी या युद्धाची ठिणगी 'पूर्वेकडून' पडेल, असा उल्लेख केला होता. सध्या आशिया आणि मध्यपूर्वेतील स्थिती पाहता, ही भविष्यवाणी खरी ठरत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या युद्धाचा सर्वाधिक परिणाम युरोपवर होईल आणि तेथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घटू शकते, असेही त्यांनी सुचवले होते. बाबा वेंगा यांनी म्हटले होते की, या संघर्षात रशिया एक शक्तिशाली देश म्हणून समोर येईल.
advertisement
इस्रायल-इराण तणाव आणि भीतीचे वातावरण
फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्च 2026 च्या सुरुवातीला इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर केलेली मोठी लष्करी कारवाई, यामुळे जागतिक शांतता धोक्यात आली आहे. तेहरानमधील महत्त्वाच्या लष्करी तळांवर झालेले हल्ले आणि इराणचा पलटवार यामुळे पूर्ण मध्यपूर्व युद्धभूमी बनले आहे. एका बाजूला इस्रायल-अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला इराणला समर्थन देणारे गट यामुळे जगाची विभागणी दोन गटांत होताना दिसत आहे, जे महायुद्धाचे मुख्य लक्षण मानले जाते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
तिसरं महायुद्ध अटळ, इराण-इस्रायलपासून झाली सुरुवात? बाबा वेंगांची जगाला धडकी भरवणारी भविष्यवाणी
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement