50 हजार डाउन पेमेंटवर Maruti Ertiga खरेदी केल्यास EMI किती येईल? पाहा हिशोब
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Maruti Ertiga on EMI: मातुरी अर्टिगाची किंमत आता सध्या 8.80 लाख रुपये (एक्स-शोरूम)ने सुरु होते. तर याचे टॉप व्हेरिएंटची किंमत जवळपास 12.94 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी चांगलं मायलेज देणारी आणि परवडणारी कार शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक भारी ऑप्शन घेऊन आलो आहोत. विशेष म्हणजे ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला फूल पेमेंट देण्याची गरज नाही. तुम्ही ती दीड लाख रुपयांच्या डाउन पेमेंट देऊन फायनेन्सवरही खरेदी करु शकता आणि इतर रक्कम सहज ईएमआयमध्ये फेडू शकता.
advertisement
नवी Maruti Suzuki Ertiga ची किंमत आता जवळपास 8.80 लाख रुपये (एक्स-शोरुम) ने सुरु होते. तर याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत जवळपास 12.94 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. एखाद्याने दिल्लीमध्ये याचे बेस LXI पेट्रोल मॉडल खरेदी केले तर आरटीओ आणि इन्शुरन्स जोडून याची ऑन-रोड किंमत जवळपास 10 लाख रुपयांच्या आसपास येते.
advertisement
दरमहा किती ईएमआय भरावा लागेल? : तुम्ही 50 हजार रुपयांची डाउन पेमेंट केली. तर इतर 8.50 लाख रुपयांचं कार लोन घ्यावं लागेल. समजा बँक तुम्हाला हे लोन 9.8 टक्के व्याजदरावर 5 वर्षांसाठी देत असेल. तर दरमहा जवळपास 19,978 रुपयांचा ईएमआय येऊ शकतो. पण लोनचा कालावधी 7 वर्षे केला तर मासिक ईएमआय कमी होऊन जवळपास 15,585 रुपये राहील.
advertisement
बाजारात तिच्या प्रतिस्पर्धी कोणत्या कार आहेत? : आता आपण मारुती एर्टिगाच्या पॉवरट्रेनबद्दल बोलूया. त्यात 1.5-लिटर स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन अंदाजे 101.65 बीएचपी पॉवर आणि 136.8 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. सीएनजी व्हेरियंटमध्ये, इंजिन अंदाजे 88 PS पॉवर आणि 121.5 Nm टॉर्क निर्माण करते. पेट्रोल मॉडेल 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे, तर सीएनजी व्हेरियंटमध्ये फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स येतो.
advertisement







