TRENDING:

Pik Vima : पीक विमा कंपन्यांचा हलगर्जीपणा! नुकसान भरपाई मिळण्याआधीच हजारो शेतकऱ्यांचे अर्ज केले रद्द

Last Updated:

Agriculture News : खरिप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून, यासाठी लवकरच अग्रीम पीक विमा देण्यात येईल, असे आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे. मात्र प्रत्यक्षात परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज विमा कंपनीने अचानक रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. insurance company has

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
परभणी : खरिप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून, यासाठी लवकरच अग्रीम पीक विमा देण्यात येईल, असे आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे. मात्र प्रत्यक्षात परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज विमा कंपनीने अचानक रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
News18
News18
advertisement

नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकऱ्यांनी वेळेवर अर्ज भरून, आवश्यक कागदपत्रे आणि समायिक क्षेत्राचे (जॉईंट डिक्लरेशन) बॉन्डही विमा कंपनीकडे जमा केले होते. सुरुवातीला कंपनीकडून अर्जामध्ये त्रुटी असल्याची माहिती SMS द्वारे शेतकऱ्यांना पाठवण्यात आली होती. अनेक शेतकऱ्यांनी त्या त्रुटी दुरुस्त केल्यानंतर पुन्हा कागदपत्रे सादर केली. मात्र, आता अग्रीम पीक विमा जाहीर होण्याच्या तोंडावरच हे अर्ज अचानकपणे रद्द करण्यात आले आहेत.

advertisement

या निर्णयामुळे हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकरी प्रश्न उपस्थित करत आहेत की, जर अर्जात त्रुटी असतील तर त्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी योग्य ती दुरुस्ती केली होती. अशा परिस्थितीत अर्ज रद्द करणे अन्यायकारक आहे. दरवर्षी नियमितपणे विमा हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा विमा कवच मिळणार नसेल, तर अशा योजनांचा उपयोग काय? असा सवालही शेतकऱ्यांनी केला आहे.

advertisement

राज्यात मागील काही आठवड्यांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा वेळी पीक विम्याचा आधार नसेल तर शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

मराठी बातम्या/कृषी/
Pik Vima : पीक विमा कंपन्यांचा हलगर्जीपणा! नुकसान भरपाई मिळण्याआधीच हजारो शेतकऱ्यांचे अर्ज केले रद्द
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल