जालना जिल्ह्यात जवळपास तीन ते चार शेतकऱ्यांनी आतापर्यंत खजुराची शेती यशस्वी करून दाखवलीये. यामध्ये घनसावंगी तालुक्यातील तणवाडी येथील शेंडगे कुटुंब देखील येतं. राम चव्हाण यांनी चार वर्षांपूर्वी 200 खजुराच्या झाडांची गुजरात येथून खरेदी केली. सुरुवातीची 100 झाडे 3800 रुपये प्रति झाड या पद्धतीने खरेदी केले. त्यानंतर झाडांची शॉर्टेज असल्याने 5200 रुपये प्रति झाड या पद्धतीने झाडांची खरेदी करावी लागली .
advertisement
डोंगरची काळी मैना! पिटुकलं फळ, पण दमदार गुणधर्म, पावसाळ्यात खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
कशी केली लागवड?
या झाडांची आपल्या तीन एकर शेतात 25 बाय 25 या अंतरावर लागवड करण्यात आली. चार वर्षानंतर या झाडांना मोठ्या प्रमाणावर खजूर लगडले आहेत. एका झाडाला साधारणपणे आठ गुच्छ लगडल्या असून एका गुच्छाच वजन साधारणपणे 15 किलोचा आसपास आहे.
किती होणार कमाई?
किरकोळ बाजारात 200 रुपये प्रति किलो तर ठोक बाजारात 100 ते 150 रुपये प्रति किलो या दराने या खजुराची विक्री केली जाते. एका झाडापासून एक क्विंटल उत्पादन होणार असल्याने 100 रुपये प्रति किलो असा दर मिळाला तरी त्यांना एका झाडापासून 10 हजार रुपये एवढं उत्पन्न मिळणार आहे. तर 200 झाडापासून 18 ते 20 लाखांचे सरासरी उत्पन्न त्यांच्या हाती येणार आहे.
शेतकऱ्यांनी खजुरासारखी नवनवीन पिकं घेतली पाहिजेत. शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग केले तरच हातामध्ये काही उरते. आपल्या इकडे या पिकाचं मार्केट तयार व्हायला आणखी वेळ लागेल. जेवढे जास्त शेतकरी या पिकामध्ये येतील तेवढ्या लवकर या पिकाचा बाजार तयार होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं, असं आवाहन राम चव्हाण यांनी केलं आहे.





