कोल्हापूर : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने कोल्हापूर शहरातील मेरी वेदर ग्राउंडवर भीमा कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कृषी प्रदर्शनात विविध शेती उपयोगी वस्तू, अवजारे आणि जनावरांचा समावेश करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनामध्ये एक चायनीज बोकड लोकांचे लक्ष वेधून घेतल आहे. चायना झिंग जातीच्या या बोकडाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होतेय.
advertisement
कवठेमहांकाळ येथील राकेश कोळेकर यांच्या मालकीचा ‘सुलतान’ नावाचा हा चायनीज बोकड आहे. सुलतान बोकडाचे वजन तब्बल 30 किलो आहे. त्याची शारीरिक रचना देखील अनोखी आहे. त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे केस असून, त्याचा आकार आणि देखणं रूप सार्वांचं लक्ष वेधून घेत आहे. राकेश कोळेकर यांनी या बोकडाची खरेदी चीनमध्ये केली होती. तेव्हा त्यांनी निव्वळ हौस म्हणून चायना झिंग प्रजातीचा बोकड विकत घेतला होता. याबाबत कोळेकर यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
चक्क अर्धा किलोचा कांदा अन् 4 किलोचा मुळा, भाज्या पाहण्यासाठी कोल्हापुरात गर्दी
कसा आहे सुलतान..?
चायना झिंग ही प्रजाती आकाराने आणि सौंदर्याने इतर बोकडांपेक्षा वेगळी आहे. हा बोकड तीन वर्षांचा असून तब्बल 30 किलो वजनाचा आहे. त्याच्या अंगावर पूर्ण पांढऱ्या रंगाचे केस आहेत. त्याची लांबी पाच फूट, उंची 1 फूट 8 इंच आणि त्याची शिंगे 1 फूट 4 इंचाची आहेत. इतर बोकडांपेक्षा हे चायनीज बोकड फार वेगळ्या प्रकारचे आहे. त्याच्या देखण्या रूपामुळे या प्रदर्शनातचे मुख्य आकर्षण ठरल आहे.
इतर जनावरांचे आकर्षण
भीमा फार्म मधील पांढरे घोडे, पुंगनूर जातीची चार वर्षाची अडीच फूट तीन गाई, नांदेड येथील अजय विश्वनाथ जाधव यांचा राम आणि रावण नाव असणारे साडेपाच वर्ष असणाते लाल कंधारी वळू खास आकर्षण ठरत आहेत. याचबरोबर सहा वर्षाचा चेतक घोडा, बेळगाव येथील सुजित शिवकुमार देशपांडे फार्म मधील म्हैशी आणि घोडे, पंढरपुरी जातीचा रेडा, हासेगाव वाडी लातूर येथील पाच वर्षाची देवणी गाय, आप्पाचीवाडी येथील विजय जाधव आणि सागर चौगुले यांचा पाच वर्षाचा शंभू बैल आकर्षण ठरत आहे. तसेच कोगील बुद्रुक येथील साडेतीन वर्ष वय असलेला सहाफूट उंची असलेल्या सोन्या नावाचा बैल आकर्षण आहे. लातूर येथील 3 वर्षे वयाचा सहा फूट उंची असलेला देवणी जातीचा बैल (वळू) देखील प्रदर्शनात लक्ष वेधतोय.