चक्क अर्धा किलोचा कांदा अन् 4 किलोचा मुळा, भाज्या पाहण्यासाठी कोल्हापुरात गर्दी
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Bhima Krishi Pradarshan: कोल्हापूरच्या भीमा कृषी प्रदर्शनात विविध भाज्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत. या भाज्यांचे वाण शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, पद्धती आणि आधुनिक ट्रेंड्सशी ओळख होण्यास लाभदायी ठरत आहेत.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील मेरी वेदर मैदानावर भीमा कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्र शासन आणि कोल्हापूर जिल्हा कृषी विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या संशोधित भाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आलंय. एकंदरीतच या प्रदर्शनाला कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आहेत.
राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने आयोजित या भव्य कृषी प्रदर्शनात महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कोल्हापूर जिल्हा कृषी विभागाने उभारलेल्या स्टॉल्समुळे शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधित भाज्यां आणि फळे पाहायला मिळतायेत. प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण म्हणजे विविध प्रकारच्या भाज्यांचे वाण, जे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, पद्धती आणि आधुनिक ट्रेंड्सशी ओळख शेतकऱ्यांना ओळख करून द्यायला मदत होत आहे. याबाबत कृषी सहाय्यक शशिकांत चौगले यांनी लोकल 18 शी बोलताना माहिती दिलीये.
advertisement
प्रदर्शनात कोणत्या भाज्या?
प्रदर्शनात विविध वाणाच्या भाज्या, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेली नवीन वाणं, तसेच आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती देखील दिली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात होणाऱ्या नव्या बदलांबद्दल सजग राहता येईल. कृषी विभागाने या प्रदर्शनाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची दिशा दाखवण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला आहे.
advertisement
भीमा कृषी प्रदर्शनातील काही प्रमुख भाज्यांमध्ये अर्जंनी येथील सात किलो वजनाचे मैलोडी जातीचे कलिंगड, शंकरवाडी कागल येथील 4 किलोचा मुळा, हेरले येथील पावणे सात किलोचा केळीचा घड आणि कडेगाव येथील 86032 वाणाचा ऊस यांचा समावेश आहे. याशिवाय, 13007 ऊस वाणाने शेतकऱ्यांना नवीन व अधिक उत्पन्न देणारा प्रयोग आकर्षण ठरत आहे. 5 किलोचा चकाट कोबी, अडीच फूट लांब असलेला दिग्विजय हरभरा, ऑर्किडच्या फुलांचा शो, तसेच गडहिंग्लज येथील रेवती जातीची ज्वारी, भडगाव गडहिंग्लज येथील सुभाष पाटील यांच्या ऑर्किड पांढऱ्या गुलाबी फुलांची विविधता शेतकऱ्यांना आकर्षित करीत आहे.
advertisement
अलिकडेच भडगाव येथील उसातील आंतरपीक घेतलेल्या मका कणीस आणि नृसिंहवाडीतील सेलम नावाच्या हळदीची उत्कृष्ट गुणवत्ता देखील प्रदर्शनातील मुख्य आकर्षण ठरली आहे. प्रदर्शनात अर्धा किलो वजनाचा कांदा, 6.800 किलो वजनाचा कोहळा आणि पावणे सात किलो केळीचा घड यासारख्या इतर भाज्याही आकर्षण ठरत आहेत. शेतकऱ्यांना या प्रदर्शनात विविध उत्पादने आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळत असल्याने त्यांना त्यांच्या शेती व्यवसायात सुधारणा करण्यास मदत होणार आहे.
advertisement
दरम्यान, या प्रदर्शनामध्ये 450 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा समावेश आहे.त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली 200 बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात आले आहेत. ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली गेली आहे. त्यामध्ये खाद्यपदार्थ नाचणी, पापड यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रदर्शन पर्वणी ठरत आहे. खाद्य पदार्थांवर ताव मारण्यासाठी नागरिक, शेतकरी कुटुंबासह याठिकाणी गर्दी करत आहेत.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
February 24, 2025 3:26 PM IST