TRENDING:

मोठी अपडेट! कृषी विभागाने तब्बल ३८ वर्षांनी घेतला महत्वाचा निर्णय, नियम-अटी जाहीर

Last Updated:

Agriculture News : आधुनिक शेतीत झालेल्या आमूलाग्र बदलांच्या पार्श्वभूमीवर, नवा काळ, नवी दृष्टी आणि नवी ओळख यानुसार विभागाने आपले नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य जाहीर केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील कृषि विभागाच्या ओळखीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. १८८१ च्या फेमीन कमिशनच्या शिफारसीनुसार स्थापन झालेल्या या विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य तब्बल ३८ वर्षांनंतर बदलण्यात आले आहे. आधुनिक शेतीत झालेल्या आमूलाग्र बदलांच्या पार्श्वभूमीवर, नवा काळ, नवी दृष्टी आणि नवी ओळख यानुसार विभागाने आपले नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य जाहीर केले आहे.
Agriculture News
Agriculture News
advertisement

ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे?

१८८३ मध्ये कृषि खात्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रात कृषी व्यवस्थापनाची पायाभरणी झाली. मे १९८७ च्या शेतकरी मासिकाच्या अंकात प्रथमच कृषि विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य सादर करण्यात आले. हेच चिन्ह आणि घोषवाक्य मागील साडेतीन दशकांपासून वापरले जात होते. मात्र, शेतीतील तंत्रज्ञान, हवामान बदल, सेंद्रिय शेती, आणि डिजिटल क्रांतीमुळे शेतीच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे विभागाने नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्याची गरज ओळखून पुढाकार घेतला.

advertisement

नव्या युगातील शेतीसाठी नवी ओळख

कृषि विभागाने तयार केलेले नवीन बोधचिन्ह आधुनिक आणि सर्जनशील दृष्टीकोनातून साकारले आहे. त्यामध्ये ‘कृषी कल्याण कर्तव्यम्’ ही ओळ प्रमुखत्वाने दिली असून, शेती हे केवळ व्यवसाय नसून समाजकल्याणाचे कर्तव्य असल्याचा संदेश दिला आहे. नवीन घोषवाक्य ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ हे विभागाच्या नव्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. या घोषवाक्याद्वारे दीर्घकालीन आणि टिकाऊ शेती पद्धतीद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक आणि सामाजिक समृद्धीचे उद्दिष्ट अधोरेखित करण्यात आले आहे.

advertisement

बोधचिन्ह वापरण्याच्या अटी काय? 

राज्य शासनाने नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याच्या वापरास अधिकृत मान्यता दिली असून काही अटी व शर्ती देखील निश्चित केल्या आहेत. जुन्या बोधचिन्हाचा गैरवापर थांबवावा. याबाबत आयुक्त, कृषि यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य सर्व प्रचारमाध्यमांत वापरावे. सरकारी दस्तऐवज, प्रसारमाध्यमे, कृषी प्रदर्शनं, शेतकरी मेळावे आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये हे चिन्ह ठळकपणे दिसावे.

advertisement

Tagline त्याच Calligraphy मध्ये वापरावी - शासन निर्णयानुसार नव्या टॅगलाईनचा फॉन्ट आणि कलात्मक सादरीकरण एकसंध ठेवण्यात येईल.

बदलाची गरज का पडली?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीनच्या दराबद्दल नवी अपडेट, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

गेल्या काही दशकांत शेतीच्या स्वरूपात मोठा बदल झाला आहे. ड्रिप सिंचन, सौरऊर्जा वापर, जैविक शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा-आधारित निर्णय हे शेतीचे नवे अध्याय आहेत. अशा काळात विभागाचे जुने बोधचिन्ह आणि घोषवाक्य कालबाह्य वाटू लागले होते. त्यामुळे नव्या पिढीतील शेतकऱ्यांपर्यंत विभागाचा संदेश स्पष्ट आणि आधुनिक पद्धतीने पोहोचावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
मोठी अपडेट! कृषी विभागाने तब्बल ३८ वर्षांनी घेतला महत्वाचा निर्णय, नियम-अटी जाहीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल