TRENDING:

मोसंबी उत्पादकांसाठी अच्छे दिन, भावात झाली तब्बल एवढी वाढ, आगामी काळात काय राहील स्थिती?

Last Updated:

मोसंबीच्या मुख्य हंगामात केवळ 8 ते 12 हजार रुपये प्रति टन भाव मिळाला. हंगामाच्या शेवटी म्हणजे सध्या मोसंबीला 18 ते 22 हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी 
advertisement

प्रतिनिधी : तापमानाचा वाढलेला पारा आणि मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने सर्वच फळांना मागणी वाढली आहे. जालना शहराची ओळख असलेली मोसंबी देखील भाव खात आहे. मोसंबीला उत्तर भारतासह कोलकत्ता, बेंगलोर येथून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. यामुळे दरांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. मोसंबीच्या मुख्य हंगामात केवळ 8 ते 12 हजार रुपये प्रति टन भाव मिळाला. हंगामाच्या शेवटी म्हणजे सध्या मोसंबीला 18 ते 22 हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे. मोसंबीच्या दरवाढीला कोणकोणते घटक कारणीभूत आहेत? आगामी काळात मोसंबी दराची स्थिती कशी असेल? याबाबत लोकल 18 ने व्यापाऱ्यांशी संवाद साधला पाहुयात.

advertisement

सध्या उत्तर भारतामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे दिल्ली, जयपूर, बनारस, कोलकत्ता, बेंगलोर अशा मोठ्या शहरांमध्ये मोसंबीला चांगली मागणी आहे. यामुळेच इथे जालन्यात जाग्यावर मोसंबीला 18 ते 22 हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे. तर काळे चट्टे असलेल्या मंगू मोसंबीला 12 ते 15 हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे. बाजारात दररोज 200 ते 250 टन मोसंबीची आवक होत आहे. आगामी काळामध्ये उन्हाची तीव्रता सातत्याने वाढणार असल्याने मोसंबीचे दर देखील वाढतच राहणार असल्याची शक्यता जालना मोसंबी अडत्या असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनघाव यांनी व्यक्त केली.

advertisement

शेतकऱ्याची भरारी, 2 एकरमध्ये मिळाले 100 टन केळीचे उत्पादन, कशी साधली किमया?

View More

जून महिन्यामध्ये सुरुवातीलाच पाऊस झाल्याने भागांना फुलोरा देखील लवकरच आला. यामुळे डिसेंबरमध्येच मृगबहराची मोसंबी बाजारात विक्रीसाठी दाखल झाली. परंतु या काळात मोसंबीची मुख्य बाजारपेठ असलेल्या उत्तर भारतात प्रचंड थंडी होती. यामुळेच जवळपास 50 टक्के मोसंबी ही अत्यंत कमी दराने विक्री झाली. यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झालं. आता मोसंबीच्या दराने गती घेतली आहे मात्र शेतकऱ्यांकडे केवळ 30 टक्के मोसंबी शिल्लक आहे. या राहिलेल्या 30 टक्के मोसंबीला मात्र चांगला दर मिळण्याची शक्यता आहे, असं घनघाव यांनी सांगितलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चांगापूरचं प्रसिद्ध हनुमान मंदिर, ‘त्या’ विहिरीला 108 प्रदक्षिणा, पूर्ण होतात मनोकामना, Video
सर्व पहा

दरम्यान, मृगबहराच्या मोसंबीवर मंगू या आजाराचा देखील प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून मंगू ग्रस्त मोसंबीला 12 ते 15 हजार रुपये प्रति टन एवढाच दर मिळत आहे. मंगू आजाराच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी देखील शेतकऱ्यांमधून होत आहे.

मराठी बातम्या/कृषी/
मोसंबी उत्पादकांसाठी अच्छे दिन, भावात झाली तब्बल एवढी वाढ, आगामी काळात काय राहील स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल