TRENDING:

पीएम किसान पाठोपाठ नमो शेतकरी योजनेचे २,००० मिळणार! पण कधी? अपडेट आली समोर

Last Updated:

Namo Shetkari Sanmman Yojana : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध आर्थिक योजना राबवत आहेत. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध आर्थिक योजना राबवत आहेत. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, सध्या या योजनेचा ८वा हप्ता अद्याप जमा न झाल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
Agriculture News
Agriculture News
advertisement

हप्ता उशिरा मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता

नमो शेतकरी योजनेचा ८वा हप्ता ठरलेल्या कालावधीत जमा होणे अपेक्षित होते. मात्र, अनेक महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे “८वा हप्ता कधी मिळणार?” हा प्रश्न आता सर्वत्र विचारला जात आहे. काही शेतकरी तर ८वा आणि ९वा हप्ता एकत्र मिळणार का, याबाबतही चौकशी करत आहेत.

advertisement

दरवर्षी ६ हजारांची मदत, पण ८वा हप्ता थांबला

या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम तीन महिन्यांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, सध्या ८वा हप्ता अजून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता जमा होऊन जवळपास दोन महिने उलटले असतानाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही.

advertisement

विलंबामागे तांत्रिक कारणे

शासकीय पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेच्या ८व्या हप्त्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. लाभार्थी यादी अद्ययावत करणे, खात्यांची पडताळणी आणि डेटाबेसमधील त्रुटी यामुळे हप्ता वितरणास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पैसे कधी मिळणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गृहिणींनो, रिस्क का घेताय? जेवणाची ‘ही’ चूक पडेल महागात, काहीही होऊ शकतं, Video
सर्व पहा

सूत्रांच्या माहितीनुसार, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच दोन्ही योजनांचे प्रत्येकी २ हजार रुपये एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकत्र मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात, होळीच्या सणाच्या आसपास ही रक्कम खात्यात जमा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
पीएम किसान पाठोपाठ नमो शेतकरी योजनेचे २,००० मिळणार! पण कधी? अपडेट आली समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल