सध्याच्या धावपळीच्या युगात वेळ वाचविण्यासाठी किंवा रात्री उरलेले अन्न फेकून देणे जिवावर येते म्हणून ते फ्रिजमध्ये ठेवले जाते. फ्रिजमध्ये अन्न ठेवल्याने ते सुरक्षित राहते, हा एक मोठा गैरसमज आहे. फ्रिजमधील अन्नाचे पोषक घटक कालांतराने कमी होतात. शिवाय उष्ण आणि दमट वातावरणात अन्नामध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात. नुसत्या वासावरून अन्न चांगले आहे की खराब हे ओळखणे चुकीचे आहे. शिळ्या अन्नावर बुरशीजन्य घटक तयार होतात.
advertisement
Health Tips : शिळे अन्न खाताय? वेळीच थांबवा सवय, नाहीतर हे होतील गंभीर परिणाम
शिळं अन्न खाल्ल्याने आरोग्याला मोठे धोके
शिळं अन्न खाल्ल्याने अन्नातील हानिकारक बॅक्टेरियामुळे उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखी होऊ शकते. तसेच काही ॲलर्जीच्या प्रकारांना देखील सामोरं जावं लागू शकतं. अन्नामुळे पोटाचे विकार आणि ॲसिडिटी वाढते हे लक्षात घ्यायला पाहिजे. शिळे, उघडे अन्न खाल्ल्यास विषबाधा देखील होऊ शकते.
रात्रीची पोळी-भाजी खाऊ नका
महिलांना रात्रीची पोळी-भाजी किंवा भात सकाळी फोडणी देऊन नाश्ता म्हणून खाण्याची सवय असते. नोकरदार महिला वेळेअभावी हेच अन्न गरम करून खातात. मात्र वारंवार गरम केल्याने त्यातील सत्त्व पूर्णपणे नष्ट होते. अन्न वाया जाऊ नये म्हणून ते खाण्यापेक्षा, ते तितकेच शिजवणे किंवा गरजू प्राण्यांना देणे केव्हाही चांगले. पण शिळे खाणे टाळणे व जास्तीत जास्त ताजे अन्न खाल्ले पाहिजे, असा सल्ला डॉ. जाधव देतात.





