TRENDING:

पीएम मोदींनी बटण दाबलं! PM Kisan चे पैसे खात्यात जमा, या पद्धतीने 2 मिनिटांत स्टेटस चेक करा

Last Updated:

PM Kisan 20th Installment : देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष ठरला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २०व्या हप्त्याचे वितरण केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष ठरला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २०व्या हप्त्याचे वितरण केले. यावेळी ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २००० रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली. या वितरणासोबतच योजनेच्या ५व्या वर्धापन दिनाचा देखील उत्सव साजरा करण्यात आला.
PM Kisan yojana
PM Kisan yojana
advertisement

PM-KISAN ही योजना २०१९ साली सुरू करण्यात आली. तिचा मुख्य उद्देश लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या शेतीसाठी आवश्यक निविष्ठा, बियाणे, खते, सिंचनासाठी पैसा उपलब्ध करून देणे. आतापर्यंत या योजनेतून ३ लाख कोटी रुपयांहून अधिक निधी शेतकऱ्यांच्या थेट खात्यांमध्ये पाठवण्यात आले आहेत.

दरवर्षी ६००० रुपयांची मदत

या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६००० रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी २००० रुपये) वितरित केली जाते. हे पैसे शेतकरी आपल्या शेतीच्या खर्चासाठी तसेच इतर घरगुती गरजांसाठी वापरू शकतात.

advertisement

२०,५०० कोटींचा आर्थिक हप्ता देशभर वितरित

या २०व्या हप्त्यांतर्गत एकूण २०,५०० कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पाठवण्यात आला आहे. ही रक्कम केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठीही बळ देणारी ठरणार आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी प्रथमच वाराणसी येथून हप्त्याचे वितरण केले.

हप्त्याची स्थिती कशी तपासाल?

जर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर खालील प्रक्रिया वापरा:

advertisement

अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://pmkisan.gov.in

"किसान कॉर्नर" या विभागात जा

"Beneficiary Status (लाभार्थी स्थिती)" या पर्यायावर क्लिक करा

तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका

कॅप्चा कोड भरा आणि "Get Data" वर क्लिक करा

स्क्रीनवर तुमचा हप्ता प्राप्त झाला आहे की नाही याची माहिती दिसेल

हप्ता मिळाला नाही? काय कराल?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

जर तुमचे नाव लाभार्थी यादीत नसेल किंवा तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल, CSC सेंटर, तालुका कृषी कार्यालय किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. तसेच तुमचे कागदपत्र, आधार क्रमांक व बँक तपशीलांची पडताळणी करून पुन्हा अर्ज करा. तसेच पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

मराठी बातम्या/कृषी/
पीएम मोदींनी बटण दाबलं! PM Kisan चे पैसे खात्यात जमा, या पद्धतीने 2 मिनिटांत स्टेटस चेक करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल