सरकारी सूत्रांनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 21 व्या हप्त्याचे 2,000 रु DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे जमा करू शकते. मात्र, अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. हप्ता पाठवण्यापूर्वी सरकारकडून राज्यांनी पाठवलेल्या शेतकऱ्यांच्या माहितीस पुन्हा तपासले जाते. तपशीलात काही चूक आढळल्यास किंवा माहिती अपूर्ण असल्यास संबंधित शेतकऱ्याचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाते.
advertisement
नाव यादीतून वगळले जाण्याची प्रमुख कारणे कोणती?
ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न केलेली किंवा कालबाह्य असणे.
आधार कार्ड व बँक खाते लिंक नसणे.
नाव, पत्ता किंवा जमिनीच्या नोंदींमध्ये चुका असणे.
बँक खाते क्रमांक किंवा IFSC कोड चुकीचा नोंदवलेला असणे.
शेतकऱ्याच्या नावावर जमीन नोंद नसणे
सरकार वेळोवेळी लाभार्थींच्या माहितीची पडताळणी करते. ज्या शेतकऱ्यांची माहिती चुकीची किंवा अपूर्ण आढळते, त्यांना हप्त्याचा लाभ मिळत नाही.
नाव यादीत आहे का, ते कसे तपासाल?
सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. “Farmers Corner” या विभागात “Beneficiary List” वर क्लिक करा.
आपले राज्य, जिल्हा, तालुका व गाव निवडा. “Get Report” वर क्लिक करा. यानंतर संपूर्ण यादी दिसेल. जर तुमचे नाव यामध्ये असल्यास, काळजी करण्याची गरज नाही. हप्ता जारी होताच पैसे थेट खात्यात जमा होतील.
यादीत नाव नसल्यास काय कराल?
ई-केवायसी पूर्ण करा - आधार मोबाईलशी लिंक असल्यास वेबसाइटवरून OTP द्वारे e-KYC करा. अन्यथा, जवळच्या CSC केंद्रात फिंगरप्रिंट किंवा फेस व्हेरिफिकेशनद्वारे प्रक्रिया पूर्ण करा.
आधार-बँक लिंकिंग तपासा - नाव, जन्मतारीख, लिंग आणि खाते क्रमांक दोन्ही नोंदींमध्ये जुळते का ते पाहा.
जमिनीच्या नोंदी दुरुस्त करा - महसूल किंवा कृषी कार्यालयात जाऊन चुकीच्या जमिनीच्या नोंदी त्वरित सुधारून घ्या.
जर पडताळणीदरम्यान तुमचे तपशील अचूक नसतील, तर तुमचा हप्ता अडकू शकतो आणि पुढील सत्रापर्यंत वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे, वेळ वाया न घालवता आजच आपल्या माहितीची खात्री करा.
