तूर हे राज्यातील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळवून देणारे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात प्रामुख्याने तूर पिकाची लागवड अधिक होते. राज्यातील सगळीकडेच हे पीक घेतले जाते. डाळवर्गीय पीक असल्याने तूरीला बाजारात चांगला दर मिळतो. परंतु, हंगामाच्या सुरुवातीला ओलावा जास्त असल्याने तूरीला 6500 रुपये प्रती क्विंटल ते 7200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत होता.
advertisement
Success Story : पुण्यातील नोकरी सोडली, गावाकडं दाखवलं शेती करण्याचं धाडस, कांद्यामधून 3 लाख उत्पन्न
अगदी आठवडाभराआधीही दर 7300 ते 7400 रुपये प्रति क्विंटल होते. परंतु, शुरुवारी तूरीच्या दरात चांगलीच वाढ पहायला मिळाली. जालना बाजारपेठेत 8 ते 9 हजार क्विंटल तूरीची आवक झाली. या तूरीला 7850 रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. केंद्र सरकारने 8000 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. त्यापेक्षा हा थोडाच कमी असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दर 9 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत जातील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
सध्या दरात वाढ झाली आहे. कर्नाटक राज्यात तूरीचे चांगले उत्पादन घेतले जाते. परंतु तिथेही अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. त्यामुळे दर्जा घसरला आहे. त्यामुळे आगामी महिनाभरात तुरीच्या दरात चांगली तेजी पहायला मिळू शकते. तूरीचे दर 8500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत देखील पोहोचू शकतात, असं व्यापारी विष्णू पाचफुले यांनी सांगितलं.





