TRENDING:

शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढली, महिला झाल्या प्रगतशील शेतकरी, तीन महिन्यात झाल्या लखपती, VIDEO

Last Updated:

पारंपरिक पिढ्यानपिढ्या पुरुष जे बोलतील ते शेतात लावलं जात होते. मात्र, या महिलांनी ती व्याख्याच बदलली. महिला ज्या बोलतील ते शेतात पिकवले जात आहे. त्यामुळे या गटशेतीच्या माध्यमातून महिलांनी महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना एक आदर्श निर्माण करून दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम बोडके, प्रतिनिधी
advertisement

सातारा - गेल्या अनेक वर्षांपासून पारंपारिक पद्धतीने पुरुष मंडळी शेतीमध्ये अग्रेसर होती. मात्र साताऱ्यातील आसनगाव येथील 15 महिलांनी या पद्धतीला मोडीत काढत 15 एकर क्षेत्रावर घेवड्याची लागवड करून प्रगतशील शेती करुन दाखवली आहे. प्रगतशील शेतकरी म्हणून आधी पुरुषाला ओळखले जात होते. मात्र, आसन गावातील महिलाही आता प्रगतशील शेतकरी झाल्या आहेत.

advertisement

अडीच महिन्यामध्ये वरुण जातीच्या घेवड्याची लागवड केल्यानंतर एकरी 1 लाख ते 1 लाख 40 हजार पर्यंतची उलाढाल अवघ्या तीन महिन्यांमध्ये या महिलांनी करुन दाखवली आहे. पारंपरिक पिढ्यानपिढ्या पुरुष जे बोलतील ते शेतात लावलं जात होते. मात्र, या महिलांनी ती व्याख्याच बदलली. महिला ज्या बोलतील ते शेतात पिकवले जात आहे. त्यामुळे या गटशेतीच्या माध्यमातून महिलांनी महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना एक आदर्श निर्माण करून दिला आहे.

advertisement

कृषीलक्ष्मी महिला शेतकरी गटाची स्थापना -

महिला शेती करणार हे ऐकून अनेकांनी या महिलांची थट्टा, चेष्टा आणि खिल्ली उडवत टीका टिप्पणी केली. मात्र, या सर्व गोष्टीकडे कानाडोळा केला आणि या महिलांनी कृषीलक्ष्मी महिला शेतकरी गटाची स्थापना करून अध्यक्षपदी स्मिता शिंदे, सचिवपदी गौरी जाधव, कोषाध्यक्ष म्हणून वनिता शिंदे यांची निवड केली. या गटामध्ये संगीता शिंदे, रुपाली शिंदे, जयश्री शिंदे, मंदा शिंदे, मोहिनी शिंदे, पुष्पा शिंदे, अलका गायकवाड, श्यामल शिंदे, विजया जाधव, फुलाबाई शिंदे, सारिका धुमाळ, रेश्मा शिंदे, रेखा शिंदे या महिला सदस्या कार्यरत आहेत.

advertisement

ड्रायव्हिंगपासून ड्रॅगनपर्यंत, बीडचा शेतकरी मालामाल, वर्षाला कमावतोय 11 लाखांचं उत्पन्न, VIDEO

शेती गटाच्या माध्यमातून महिलांनी आसनगाव शिवारातील भौगोलिक स्थितीचा अभ्यास आणि बाजारपेठेतील मागणीचा विचार करून वरुण जातीच्या घेवड्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. याप्रमाणे उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्राची जोड देण्यात आली आहे. आजच्या घडीला प्रत्येक महिलांचे एक एकरप्रमाणे 15 एकरावर घेवड्याची लागवड केली असून ती काढण्याची कामे सध्या जोरात सुरू आहेत.

advertisement

pitru paksha 2024 : पितृपक्षातील ‘या’ 4 तिथी फार महत्वाच्या, या दिवसात नेमकं काय करावं, VIDEO

या 15 महिला एकत्र येऊन शेतीसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत, त्या एकत्र येऊन करतात. नांगरणी, कुळवणी, खुरपणी, भांगलन, किंवा पाणी देणे या सर्व पाच पाच महिलांचा ग्रुप करून प्रत्येक महिलांच्या शेतात जाऊन काम करतात. त्यामुळे महिलांचे आर्थिक गणित देखील बसू लागले आहे. घेवड्याची लागवड बेड पद्धतीने केली आहे. संपूर्ण 15 एकर शेतीवर सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करत आहेत. वरुण घेवडा जातीच्या दर्जेदार बियाण्याची निवड करून कीटकनाशकांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कीड नियंत्रणासाठी कामगंध चिकट, सापळे, पक्षी थांब्याची उभारणी, दशपर्णी अर्काचा वापर करण्यात येते.

15 एकर मधून सरासरी किती उत्पन्न -

शेती गटातील महिलांना एकरी 10 ते 14 क्विंटल घेवड्याचे उत्पादन मिळू लागले आहे. शेती गटातर्फे उत्पादित सर्व घेवड्याची एकत्र विक्री केल्याने किलोला 110 ते 140 रुपये दर मिळत आहे. खर्च वजा करता चांगला आर्थिक नफा हाती शिल्लक राहू लागला आहे. त्यामुळे तीन महिन्यातच घेवडा पिकाचे उत्पादन घेऊन या महिला लखपती होऊ लागल्या आहेत. सरासरी 1 लाख ते 1 लाख 40 हजार रुपये पर्यंतचे उत्पादन या प्रगतशील महिला घेत आहेत. त्यांच्या या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. यासोबतच गावातही या महिलांची प्रतिष्ठा वाढली आहे. अनेक महिलांना त्यांनी प्रोत्साहन देऊन गट तयार करून शेती करण्यासाठी आवाहनही केले आहे.

मराठी बातम्या/कृषी/
शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढली, महिला झाल्या प्रगतशील शेतकरी, तीन महिन्यात झाल्या लखपती, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल