६ रब्बी पिकांना विमा संरक्षण
रब्बी हंगाम २०२५-२६ साठी राज्यातील अधिसूचित क्षेत्रांमध्ये सहा पिकांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे त्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत. गहू (बागायत), रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा
या पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळ आणि क्षेत्राची नोंद आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपला अर्ज या अटी पूर्ण करून सादर करणे बंधनकारक असेल.
advertisement
कोणत्या जिल्ह्यात कोणती विमा कंपनी?
राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या विमा कंपन्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.
भारतीय कृषी विमा कंपनी (AIC): हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी.
आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनी: धाराशिव (उस्मानाबाद), लातूर आणि बीड जिल्ह्यांसाठी.
इतर जिल्ह्यांसाठी (अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर, सातारा, जळगाव, नांदेड, नागपूर, वर्धा, परभणी, जालना, गोंदिया, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार) संबंधित विमा कंपन्या कार्यरत राहतील.
विमा भरण्याच्या अंतिम मुदत किती?
शेतकऱ्यांनी विमा अर्ज वेळेत भरावा, यासाठी सरकारने स्पष्ट अंतिम मुदती निश्चित केल्या आहेत.
रब्बी ज्वारीसाठी:३० नोव्हेंबर २०२५
गहू (बागायत),हरभरा आणि रब्बी कांदा: १५ डिसेंबर २०२५
उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग: ३१ मार्च २०२६
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या सूचना
कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेमार्फत विहित नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास, त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी आपल्या बँकेस लेखी स्वरूपात याची माहिती द्यावी लागेल. हे न केल्यास शेतकऱ्याचा विमा आपोआप लागू होईल.
अधिक माहितीसाठी संपर्क कुठे करायचा?
शेतकऱ्यांना अधिक माहिती किंवा मदत हवी असल्यास त्यांनी खालील ठिकाणी संपर्क साधावा. संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
दरम्यान, राज्यातील अनेक शेतकरी अनिश्चित हवामान, पाऊस, गारपीट आणि दुष्काळामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जातात. या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातही पंतप्रधान पीक विमा योजना लागू झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संरक्षण मिळेल.
