मोहोळ तालुक्यातील येवती गावात राहणाऱ्या राजाराम कदम यांनी 45 दिवसांपूर्वी 14 गुंठ्यामध्ये रजनीश व्हरायटीच्या दोडक्याची लागवड केली होती. दोडक्याची लागवड करण्याअगोदर जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करून दोडक्याच्या बियांचे दोन फुटांवर अंतरावर ठेवून दोडक्याच्या बियांची लागवड केली, तर बेडमधील पाच फुटाचे अंतर राजाराम यांनी ठेवले.
अहो खरंच! पुण्यात दिसली चार पायाची कोंबडी, पाहण्यासाठी लागल्या रांगा, Video
advertisement
दोडक्यावर कोणताही रोग येऊ नये यासाठी एक दिवसाआड फवारणी केली. लागवडीपासून 45 दिवसानंतर दोडका तोडण्यास सुरुवात होते. एकदा दोडक्याची लागवड झाल्यास दोन दिवसाआड दोडक्याची तोडणी करावी लागते. सध्या दोडक्याला बाजारात चांगला भाव मिळत असून एका व्यापाऱ्याने जाग्यावरून पन्नास रुपये किलो दराने राजाराम कदम यांच्याकडून दोडका खरेदी केला आहे. दोडका विक्रीतून जवळपास 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळणार असल्याची माहिती राजाराम कदम यांनी दिली.
दोडक्याच्या वाढीवर विशेष लक्ष देऊन राजाराम कदम यांनी रजनीश या व्हरायटीच्या दोडक्याची लागवड केली आहे. जे कमी वेळेत कमी खर्चात अधिक उत्पन्न देतो. शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करून योग्य प्रकारचे भाजीपाला पीक घेतल्यास कमी गुंठ्यातही अधिकाधिक उत्पन्न मिळवू शकतो, असा सल्ला शेतकरी राजाराम कदम यांनी दिला आहे.





