सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत 100 गाड्या कांद्याची आवक होत आहे. एकादशी असल्यामुळे जास्त शेतकरी वारकरी असल्यामुळे कांद्याची आवक कमी आहे. तरी देखील कांद्याला भाव वरचढ नसून सरासरी कांद्याला 1500 ते 1800 रुपये क्विंटल दर बाजारात मिळत आहे. क्वचित एकद्या शेतकऱ्याच्या चांगल्या कांद्याला 2 हजार ते 2100 रुपये पर्यंत दर मिळत आहे. मागील वर्षी याच वेळी 200 ते 250 गाड्या कांद्याची आवक झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कांद्याची आवक कमी आहे, अशी माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी दिली.
advertisement
Farmer Success Story: शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!
मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची आवक सोलापूर जिल्हा आणि विजयपुरा जिल्हा येथून कांद्याची आवक होत आहे. सोलापूर जिल्ह्यातून आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ येते कांदा पाठविला जात आहे.आवक कमी असूनही कांद्याचे दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करत आहे अशी माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी दिली.