सोलापूर शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर गणेश सोनकडे यांची श्री हनुमान दूध डेअरी आहे. गणेश सोनकडे यांच्या गोठ्यात 70 ते 80 मुर्रा जातीच्या म्हशी आहेत. या म्हशीपासून दररोज 250 ते 300 लिटर दूध विक्री केली जाते. म्हशी पासून मिळणाऱ्या शेणाचाही शेणखत विक्री केला जात आहे.
advertisement
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपिकता घसरत चालली आहे. म्हणून आता शेतकरी राजा सेंद्रिय शेती, जैविक शेती करण्यावर भर देत आहेत. त्यासाठी शेतकरी मुख्यतः शेणखताचा वापर करत आहेत. मात्र, यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्यांची पशुधनात होणारी घट यामुळे शेणखताला सध्या सोन्याचा भाव आला आहे.
सोलापुरात सध्या एक ब्रास शेणखत 3 ते 4 हजार रुपयांना विकले जात आहे. काही वर्षांपासून पशुधनाची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे गावशिवारात सहज मिळणाऱ्या शेणखताला आता सोन्याचा भाव आला आहे. पूर्वी एक हजार ते दीड हजार रुपये ट्रॅक्टर-ट्रॉली या दराने शेणखत मिळत होते, ते सध्या 3 हजार ते 4 हजार ट्रॉलीप्रमाणे मिळत आहे. शेणखत विक्रीच्या माध्यमातून गणेश सोनकडे वर्षाला 3 ते 4 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.