सोलापूर : कांदा या पिकांवर अवलंबून न राहता शेतकऱ्याने 12 गुंठ्यात कांदा बीजोत्पादन शेती फुलविली आहे. मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातली शेतकरी मोतीराम धोडमिशे हे गेल्या 7 ते 8 वर्षांपासून कांदा बीजोत्पादन शेती करत आहेत. कांदा बीजोत्पादनसाठी 22 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. तर यातून 2 ते 3 लाख रुपयांपर्यंतचा नफा शेतकरी मोतीराम धोडमिशे यांना मिळत आहे. या शेती संदर्भात अधिक माहिती शेतकरी मोतीराम धोडमिशे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
शेतकरी मोतीराम धोडमिशे राहणार हराळवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर हे गेल्या 7 ते 8 वर्षांपासून कांदा बीजोत्पादन शेती करत आहेत. एकीकडे शेतकरी एका एकरातून कांदा लागवड करून 2 ते 3 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत तर दुसरीकडे फक्त 12 गुंठ्यात कांदा बीजोत्पादन करत शेतकरी मोतीराम धोडमिशे हे 2 ते 3 लाख रुपयांचा नफा घेत आहेत.
उसात घेतलं बटाट्याचं आंतरपीक, शेतकऱ्याला 3 लाख रुपयांचा नफा, कशी केली यशस्वी शेती?
पंचगंगा एक्सपोर्ट रेड असे या कांदा बीज उत्पादन बियाण्याचे नाव आहे. दुकानांमध्ये मिळणाऱ्या बियाण्यापेक्षा या बियातून शेतकऱ्यांना उत्पन्न चांगले मिळत आहे. कारण त्या बियाण्याची उगवण क्षमता कमी जास्त असते. परंतु या बियाण्याची कांदा उगवण क्षमता जास्त आहे. त्यांच्या कांदा बीजोत्पादनामधून निघालेल्या कांदा बियाणाला तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात मागणी करतात.
पंचगंगा एक्सपोर्ट रेड या बियाण्याला चांगली मागणी आहे. तसेच सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत याच कांद्याची विक्री जास्तीत जास्त प्रमाणात होते. कांदा बीजोत्पादनासाठी नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात लागवड करून मार्च ते एप्रिल महिन्यात बियाणे काढले जातात. त्यानंत मार्केटमध्ये 2000 रुपयापासून ते 2200 रुपये किलो या दराने या बियाची विक्री करत आहेत. कांदा बीजोत्पादन शेती करण्यासाठी शेतकरी मोतीराम धोडमिशे यांना 20 ते 22 हजार रुपये खर्च येतो. तर बियाणे विक्री करून सर्व खर्च वजा केल्यास त्यांना 2 ते 3 लाख रुपयांचा नफा मिळत असल्याची माहिती शेतकरी मोतीराम धोडमिशे यांनी दिली आहे.