पेनुर येथील शेतकरी राजू राजगुरू यांनी सव्वा एकरात केशर आंब्याची लागवड केली आहे. सव्वा एकरात 12 बाय 5 या पद्धतीने केशर आंब्याच्या रोपांची लागवड केली आहे. राजगुरू यांची ही तीन वर्षाची बाग असून सव्वा एकरात त्यांनी 600 रोपांची लागवड केली आहे. केशर आंब्याची लागवड करण्यासाठी राजू राजगुरू यांना 50 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे.
advertisement
राजगुरू यांनी सोशल मीडिया, युट्युबवर माहिती घेऊन केशर आंब्याची लागवड केली आहे. राजगुरू यांची केशर आंबाची ही पहिलीच तोडणी असून आतापर्यंत त्यांना 80 ते 1 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. केशर आंब्याची अजून विक्री सुरू असून आंबा विक्रीतून अजून दीड ते 2 लाखाचे उत्पन्न मिळणार असल्याची ही माहिती शेतकरी राजू राजगुरू यांनी दिली आहे.
शेतकरी राजू राजगुरू हे आंब्याची विक्री बाजारात न करता थेट बांधावरून स्वतः ग्राहकांना विक्री करत आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतीमाल बाजारात न विक्री करता स्वतः विक्री करावे आणि त्यातून अधिकाधिक उत्पन्न कमवावे, असा सल्ला शेतकरी राजू राजगुरू यांनी दिला आहे.