सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील दाईंगडेवाडी गावातील नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या शेतकऱ्याने मित्रांनी दिलेल्या सल्ल्यानुसार द्राक्ष बागेची शेती केली असून यातून शेतकरी संतोष दाइंगळे यांना 25 लाख रुपयापर्यंतचा नफा मिळणार आहे. मित्राने दिलेला सल्ला ऐकून शेती केल्याने शेतकरी संतोष हे लखपती होणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी शेतकरी संतोष दाइंगळे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
advertisement
शेतकरी संतोष दाइंगळे यांनी मित्रांनी दिलेल्या सल्ल्यानुसार द्राक्ष बागेची लागवड केली आहे. दीड एकरात माणिक चमन या जातीच्या द्राक्षाची लागवड त्यांनी केली आहे. तर दीड एकरात क्लोन या जातीच्या द्राक्षाची लागवड केली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून तीन एकरात शेतकरी संतोष दाइंगळे हे द्राक्ष बागेची शेती करत आहेत. द्राक्षांच्या बागेत दररोज पाहणी करून योग्य त्या औषधांची फवारणी संतोष दाइंगळे यांनी केली आहे. त्यामुळे या द्राक्षांवर कोणत्याही प्रकारचा रोग आला नाही.
नोकरीत मन रमले नाही, तरुणाने सुरू केला एमबीए बर्गर स्टॉल, आता महिन्याला 1 लाख कमाई
संतोष यांना द्राक्ष बागेची लागवड करण्यासाठी तीन एकराला लागवड, औषध फवारणी, मजुरी आदी खर्च मिळून संतोष दाइंगळे यांना तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. तर द्राक्ष विक्रीतून त्यांना 20 ते 25 लाख रुपयांचा नफा मिळणार असल्याची माहिती संतोष यांनी दिली आहे. संतोष यांचे बागेतील द्राक्षे विक्री तसेच बेदाणा तयार करण्यासाठी सांगोला येथील तासगाव येथे पाठवले जात आहेत. उच्चशिक्षित तरुणांना नोकरी जर मिळत नसेल तर निराश न होता त्यांनी शेतीकडे वळावे, असे आवाहन तरुण शेतकरी संतोष दाइंगळे यांनी केले आहे.