सोलापूर: सध्याच्या काळात अनेक शेतकरी भरघोस उत्पन्नासाठी आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. सोलापूर जिल्ह्यात जनावरांना चारा म्हणून अनेकजण मक्याची शेती करतात. मोहोळ तालुक्यातील कातेवाडीच्या एका महिला शेतकऱ्यानं मक्याचं विक्रमी उत्पादन घेतलंय. ललिता वाघमोडे यांनी एका एकरात तब्बल 45 क्विंटल मका घेतलीये. 30 हजारांचा खर्च वजा जाता त्यांना दीड लाखांपर्यंतचं उत्पन्न मिळालं आहे. त्यांनी आपल्या शेतीतून ही किमया कशी केलीय़? याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
महिला शेतकरी ललिता वाघमोडे या पारंपरिक शेतकरी आहेत. घरी जनावरे असल्याने चाऱ्यासाठी आणि विक्रीसाठी त्या मक्याची शेती करतात. त्यांनी सुरुवातीला एका एकरात मक्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेकांनी मक्याची शेती परवडत नसल्याचा सल्ला दिला. मात्र, योग्य नियोजन करून ललिता यांनी मका लागवड करण्याचा निर्णय घेतला.
YouTube वर व्हिडिओ पाहिला अन् कोल्हापुरात पिकवलं काश्मिरी सोनं, शेतकऱ्यानं कशी केली कमाल?
एका एकरात 45 टन मका
जमीन नांगरणी करून रोटरून मक्याची लागवड केली. अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मक्यावर वेळोवेळी कीटकनाशके फवारणी केली. ललिता वाघमोडे यांनी एका एकरातून 20 क्विंटल मक्याचे उत्पादन मिळेल अशी आशा ठेवले होती. पण मक्याचं योग्य नियोजन वेळोवेळी खत औषध फवारणी केल्यामुळे त्यांनी एका एकरातून 45 क्विंटल मक्याचे उत्पादन घेतला आहे.
दीड लाखांचं उत्पन्न
ललिता वाघमोडे यांना एका एकरात मका लागवडीसाठी 30 हजार रुपये पर्यंत खर्च आला आहे. तर लागवडी फवारणी,खत हा सर्व खर्च वजा करून मका विक्रीतून वाघमोडे यांना दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. महिला देखील शेती क्षेत्रात चांगली प्रगती करू शकता. मला शेतीची आवड असल्याने मी अंगणवाडीत नोकरीला असताना देखील शेती करते. सकाळ संध्याकाळ शेतात राबते. मका लागवडीतून अपेक्षेपेक्षा चांगलं उत्पन्न मिळाल्याचा आनंद आहे, असं ललिता सांगतात.