YouTube वर व्हिडिओ पाहिला अन् कोल्हापुरात पिकवलं काश्मिरी सोनं, शेतकऱ्यानं कशी केली कमाल?

Last Updated:
Apple Farming: ऊस आणि भात पिकासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या मातीत आता काश्मिरी सोनं पिकतंय. यळगूडच्या शेतकऱ्यानं केलेल्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा आहे.
1/9
जम्मू-काश्मीरच्या थंड हवामानातून येणारी लाल रंगाची रसाळ सफरचंदे आता कोल्हापुरच्या मातीतही पिकत आहेत. कोल्हापुरच्या हवामानात बदल असले तरी या मातीत सफरचंदाची शेती शक्य आहे, हे एका कोल्हापूरच्या प्रयोगशील शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवलंय.

advertisement
2/9
हातकणंगले तालुक्यातील यळगूड गावातील अनिल माणगावे या शेतकऱ्याने अर्ध्या एकर जमिनीवर सफरचंदाची लागवड केली आहे. सफरचंदासोबतच त्यांनी केशर आंबा, पेरू, चिकू, शेवगा, कांदा आणि लसूण ही आंतरपिकेही घेतली आहेत. विशेष म्हणजे माणगावे यांचे शिक्षण फक्त सातवीपर्यंत झाले आहे.

3/9
शिक्षण कमी असूनही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सफरचंद लागवडीची माहिती मिळवली आणि हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. त्यांनी सफरचंदाची शेती प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली.

4/9
माणगावे यांनी सुरुवातीला 50 सफरचंदाची झाडे लावली आहेत. या प्रत्येक झाडाला सुमारे 30 ते 35 फळे लागली असून, एका झाडापासून 5 किलो सफरचंद मिळत आहेत.

5/9
झाडांसाठी खड्डे खणून त्यात लागवण केल्यानंतर, माणगावे यांनी फक्त शेणखताचा वापर केला आहे. डिसेंबर महिन्यापासून त्यांनी झाडांना पाणी देणे बंद केले. त्यानंतर पानगळ झाल्यावर पुन्हा नवीन पालवी फुटली. फुलांनंतर मार्च महिन्यात फळ धरायला सुरुवात झाली आणि एप्रिल-मे महिन्यांत झाडांना सफरचंद लागले.

6/9
या सफरचंदांचा आकार मोठा असून रंग आणि चव उत्तरेकडून येणाऱ्या सफरचंदांसारखीच आहे. यामुळे माती वेगळी असली तरीही शेतकरी सफरचंदाचे उत्पादन घेऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले असून, पंचक्रोशीतील शेतकरी त्यांच्या सफरचंदाच्या शेतीला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

7/9
माणगावे यांच्याकडे वडिलोपार्जित साडेतीन एकर शेती आहे. त्यापैकी तीन एकरांत उसाची लागवड केली जाते, तर अर्ध्या एकरात विविध आंतरपिकांचा प्रयोग ते करतात. माणगावे हे व्यवसायाने व्यावसायिक असले तरी त्यांचे कुटुंब शेतीसाठी विशेष वेळ देते. घरातील सर्वच सदस्य शेतीत सहभागी होतात, त्यामुळेच विविध पिकांची लागवड करून ते हे प्रयोग यशस्वी करत आहेत.

8/9
सातवीपर्यंतच शिक्षण घेतलेल्या माणगावे यांनी युट्यूब आणि सोशल मीडियाचा आधार घेतला. त्यांनी सफरचंद लागवडीची सखोल माहिती व्हिडिओंमधून मिळवली आणि ती प्रत्यक्षात आणली. मातीची तयारी, झाडांची छाटणी आणि पाणी व्यवस्थापन यासारख्या गोष्टी त्यांनी ऑनलाइन शिकून आत्मसात केल्या.

9/9
माणगावे यांच्या प्रयोगाचे परिणाम त्यांच्या अर्ध्या एकर शेतीपुरते मर्यादित नाहीत. ऊस आणि भाताच्या शेतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापुरात देखील आता फळबागांची शेती केली जाऊ शकते. माणगावे यांचा हा प्रयोग अशा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement