Marathwada Mukti Sangram: एमआयएम मुक्ती संग्रामाच्या ध्वजारोहणात सहभागी का होत नाही? तत्कालीन निजामाशी थेट कनेक्शन
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Marathwada Mukti Sangram: भारत स्वातंत्र्य झाल्याच्या 13 महिन्यानंतर निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त झाला.
छत्रपती संभाजीनगर : 17 सप्टेंबर हा दिवस 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन' म्हणून साजरा करतात. मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त व्हावा, यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. भारत स्वातंत्र्य झाल्याच्या 13 महिन्यानंतर निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त झाला. पण, तत्कालीन अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचा (MIM) मराठवाडा मुक्ती संग्रामला विरोध होता. एमआयएमचा मुक्ती संग्रामाला विरोध का होता, याबाबत अभ्यासक सारंग टाकळकर यांनी लोकल18शी बोलताना सविस्तर माहिती दिली.
सातवा निजाम मीर उस्मान अली खान याने 'मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' हा राजकीय पक्ष काढला होता. या निजामाने 37 वर्षे राज्य केलं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये एमआयएम हा पक्ष धार्मिक अस्मितेसाठी ओळखला जात होता. बहादूर जन या संघटनेचे प्रमुख होते. त्यांच्या काळामध्येच कासिम रझवीचा उदय झाला. संघटनेचे प्रमुख निवृत्त झाल्यानंतर कासिम रझवीने पक्षाचा कारभार आपल्या ताब्यात घेतला.
advertisement
कासिमला तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता. ही बाब निजामाने हेरली. आपल्याविरुद्ध सुरू असलेलं जनआंदोलन चिरडण्यासाठी आपल्याला एमआयएमचा उपयोग होईल, हे निजामाच्या लक्षात आलं. त्याने कासिम रझवीला बळ देण्यास सुरुवात केली. या बाळाचा गैरवापर करत कासिम रझवीने शेवटच्या टप्प्यामध्ये एक रझाकार संघटना उभी केली. या संघटनेकडे, निजामापेक्षा जास्त 2 लाख फौज होती. या फौजेने महिला आणि लहान मुलांवर अत्याचार करायला सुरुवात केली. त्यामुळे आंदोलन चिघळलं. शेवटी मराठवाड्यातल्या जनतेला देखील हातात शस्त्रं घ्यावी लागली.
advertisement
तेव्हाचा एमआयएम पक्ष आणि सध्याच्या एमआयएमच्या नावामध्येच फरक आहे. 'मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' हे तत्कालीन नाव होतं. सध्याच्या एमआयएमचं नाव 'ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' हे नाव आहे. हा पक्ष आता देशव्यापी झालेला आहे. मात्र, दोन्हींचा पाया एकच आहे. दोन्ही पक्ष धार्मिक आधारावर आहेत. आजही एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ध्वजारोहणाला येत नाहीत, अशी माहिती अभ्यासक सारंग टाकळकर यांनी दिली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 15, 2025 10:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Marathwada Mukti Sangram: एमआयएम मुक्ती संग्रामाच्या ध्वजारोहणात सहभागी का होत नाही? तत्कालीन निजामाशी थेट कनेक्शन