Dashavatar : "...आणि इथेच जिंकला मराठी चित्रपट", अमराठी प्रेक्षकाकडून 'दशावतार'चं भरभरून कौतुक; अश्रू अनावर, VIDEO

Last Updated:

Dashavatar : 'दशावतार' हा बहुचर्चित चित्रपट पाहून एका अमराठी प्रेक्षकाला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहेत.

News18
News18
Dashavatar : 'दशावतार' या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या तुफान चर्चा आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जगभरातील सिनेप्रेमींकडून या सिनेमाला उत्फुर्त प्रतिसाद मिळतोय. वयाच्या 81 व्या वर्षी दिलीप प्रभावळकर यांनी ज्या पद्धतीने बाबुली मेस्त्रीची भूमिका साकारली आहे त्याचं मराठी इंडस्ट्रीसह सर्वसामान्य प्रेक्षकांकडूनही तोंडभरून कौतुक होतंय. 'दशावतार'च्या टीमकडून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया शेअर करण्यात येत आहेत. यातील एका अमराठी प्रेक्षकाची बोलकी प्रतिक्रिया मात्र नेटकऱ्यांचं चांगलच लक्ष वेधून घेत आहे.
'दशावतार' पाहून थिएटरबाहेर पडताना भाऊक झालेला प्रेक्षक पाहायला मिळत आहे. फक्त मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकदेखील मोठ्या प्रमाणात थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहत आहेत. फक्त पाहतच नाही तर या सिनेमाचं कौतुक करतानादेखील दिसून येत आहेत.
अमराठी चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल!
'दशावतार'च्या टिमने एका अमराठी चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिनेमा पाहिल्यानंतर अश्रू अवावर झालेला हा प्रेक्षक हिंदीत म्हणतोय,"मी अमराठी आहे. जुहूवरुन मी हा चित्रपट पाहण्यासाठी खास आलो आहे. यावेळी एक गोष्ट मला सांगायची आहे की, दिलीप प्रभावळकर सर महान अभिनेते आहेत. आमचा त्यांना सॅल्युट. आम्हाला मराठी चित्रपट आणि तुम्ही सगळे खूप आवडले आहेत". दरम्यान उपस्थितीत सर्व प्रेक्षकांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटासह स्टँडिंग ओव्हेशनदेखील दिलं. तसेच या अमराठी प्रेक्षकाने खूर्चीवर चढून मोठ-मोठ्याने टाळ्या वाजवत स्टँडिंग ओव्हेशन दिलं.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by @dashavatarfilm



advertisement
'दशावतार'च्या टीमने शेअर केलेल्या या व्हिडीओवर कमाल चित्रपट, मराठी कलाकारांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद, अप्रतिम चित्रपट, सर्वच कलाकारांचं मनापासून कौतुक, दिलीप प्रभावळकर सर तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी केल्या आहेत.
एकीकडे मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नाही, अशी ओरड असताना 'दशावतार' या चित्रपटाचे शो वाढवण्यात येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे अमराठी प्रेक्षक बॉलिवूडपट पाहण्यापेक्षा खास हा मराठी चित्रपट पाहणं पसंत करत आहेत. एकंदरीतच मराठी इंडस्ट्रीसाठी ही सुखावणारी बाब आहे.
advertisement
दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर, लोकेश मित्तल हे कलाकार 'दशावतार' या चित्रपटात झळकले आहेत. सुबोध खानोलकरने 'दशावतार'चे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाचे संवाद आणि यातील गीते गुरू ठाकूरची आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dashavatar : "...आणि इथेच जिंकला मराठी चित्रपट", अमराठी प्रेक्षकाकडून 'दशावतार'चं भरभरून कौतुक; अश्रू अनावर, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement