सोनालिका डीआय 35 (39 एचपी) वर मोठी सूट
सोनालिकाची पहिली मोठी ऑफर डीआय 35 ट्रॅक्टरवर लागू आहे. या मॉडेलवर कंपनीकडून 70,000 रुपयांपर्यंतची थेट सूट देण्यात आली आहे. या ट्रॅक्टरची मूळ किंमत जीएसटीपूर्वी 5,99,900 होती. नोव्हेंबर ऑफरमध्ये आणि जीएसटी कपातीनंतर ही किंमत 5,29,900 इतकी कमी झाली आहे.
ट्रॅक्टरची खास वैशिष्ट्ये कोणती?
advertisement
2780 सीसी, 3 सिलेंडर इंजिन, 39 एचपी पॉवर, 8 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स गीअर्स, ऑइल-इमर्स्ड ब्रेक्स तसेच 2000 किलोपर्यंत उचलण्याची क्षमता आहे. थ्रेशर, रोटाव्हेटर, हॅरो, कल्टिव्हेटर यांसारख्या उपकरणांसाठी हा ट्रॅक्टर उत्तम पर्याय ठरतो. 5 लाखांच्या बजेटमध्ये 39 एचपीचा दमदार ट्रॅक्टर शोधणाऱ्यांसाठी ही निश्चितच एक चांगली संधी आहे.
सोनालिका डीआय 734 पी+, 5 लाखांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ऑफर म्हणजे सोनालिका डीआय 734 पी+ या मॉडेलवर मिळणारी मोठी किंमत कपात. या 37 एचपी ट्रॅक्टरची मूळ किंमत 5,49,900 होती. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या ऑफर आणि जीएसटी कपातीनंतर, हा ट्रॅक्टर फक्त 4,86,900 मध्ये उपलब्ध आहे.
मॉडेलची वैशिष्ट्ये काय?
2780 सीसी वॉटर-कूल्ड इंजिन, 3 सिलेंडर, 37–39 एचपी पॉवर आउटपुट, 8 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स गीअर्स, ड्राय डिस्क ब्रेक, 2000 किलोपर्यंत उचलण्याची क्षमता.दैनंदिन शेतीकाम, पिक प्रक्रिया, वाहतूक यांसाठी हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना उत्कृष्ट कामगिरी देतो.
तसेच या दोन प्रमुख मॉडेल्स व्यतिरिक्त, सोनालिका डीएलएक्स डीआय 55 आणि सोनालिका डीएलएक्स डीआय 60 वरसुद्धा आकर्षक ऑफर लागू आहेत. या सर्व सवलती फक्त नोव्हेंबर महिन्यासाठीच लागू असणार आहे.
इतर ब्रँड्सवरही सवलती उपलब्ध
सोनालिकासोबतच काही डीलरशिपवर महिंद्रा 215 युवराज मॉडेलवर देखील 40,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या काळात ट्रॅक्टर खरेदीचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.
