जालना शहरातील मोसंबी बाजारात सध्या 100 ते 150 टन मोसंबीची आवक दररोज होत आहे. जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस होतोय, यामुळे 300 ते 400 टनापर्यंत असलेली आवक शंभर ते दीडशे टणापर्यंत खाली आली आहे. यामुळे दरामध्ये प्रति टन चार ते पाच हजार रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळतंय. मागील आठवड्यामध्ये मोसंबीचे दर 14 ते 17 हजार रुपये प्रति टन यादरम्यान होते. सध्या मोसंबीला 18 ते 22 हजार रुपये प्रति टन असा दर मिळतोय.
advertisement
Food Business: ब्रँड सोडा, इथं फेमस आहे गावचा पेढा, आजोबांची कमाई नको, खवय्यांची गर्दी पाहा!
परंतु आगामी काळात पावसाने उघडी दिल्यानंतर मोसंबी बाजारात मोसंबीच्या आवकेत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. यामुळे मोसंबीचे दर दबावात येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोसंबी बाजाराचे गणित लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने मोसंबीची विक्री करावी, जेणेकरून त्यांच्या पदरात योग्य दर पडेल, असे आवाहन नाथा पाटील घनगाव यांनी शेतकऱ्यांना केले.





