पहिल्या प्रयोगात नुकसान, दुसऱ्यांदा यश
चार वर्षांपूर्वी, दत्तात्रय जगताप, रमेश जगताप आणि बाबूराव डुबूल यांच्यासह काही शेतकऱ्यांनी पहिल्यांदा ढोबळी मिरचीची लागवड केली होती. मात्र, बाजारभाव न मिळाल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले. परंतु यावर्षी त्यांनी पुन्हा आत्मविश्वासाने ढोबळी मिरचीची लागवड केली आणि दुसऱ्याच प्रयत्नात विक्रमी यश संपादन केले.
ढोबळी मिरची दिल्ली, जयपूर, कोलकाता बाजारात
advertisement
या मिरच्यांचे माल जयपूर, दिल्ली, कोलकाता अशा मोठ्या शहरांच्या बाजारपेठांमध्ये थेट पाठवले जात आहे. व्यापारी मिरची खरेदीसाठी शेतावरच पोहोचत असल्याने वाहतूक व विक्री खर्चातही बचत झाली आहे.
गटशेतीचे यशस्वी मॉडेल
गटशेती हा यशाचा किल्ला ठरला. रमेश जगताप, दत्तात्रय जगताप आणि बाबूराव डुबूल या तिघांनी गटशेतीचा प्रयोग करत प्रत्येकी एक एकर क्षेत्रात लागवड केली. एकत्र नियोजन, सल्ला आणि व्यवस्थापन यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली.
जगतापांचा शेतकऱ्यांना सल्ला
"परिस्थिती कितीही कठीण असो, योग्य नियोजन, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर यश निश्चित आहे. आजच्या काळात शेतीत प्रयोग करणे ही गरज आहे.कारण पारंपरिक पद्धतींनी फारसे साध्य होत नाही," असे दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.
