इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हे केवळ प्रदूषणमुक्तच नाही, तर कमी आवाज, कमी देखभाल खर्च आणि दीर्घकालीन आर्थिक फायदे देणारे ठरू शकतात. भारत सरकारदेखील इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी FAME (Faster Adoption and Manufacturing of Hybrid and Electric Vehicles) योजनेद्वारे अनुदान देत आहे. काही राज्यांमध्ये या ट्रॅक्टरचे प्रायोगिक प्रकल्पही सुरू आहेत.
इलेक्ट्रिक ट्रॅक्टर का निवडावा?
सध्याच्या डिझेल ट्रॅक्टरमुळे मोठ्या प्रमाणावर वायू व ध्वनी प्रदूषण होते. शिवाय डिझेलचे दरही सतत वाढत आहेत. याच्या तुलनेत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चालवणे स्वस्त असून, त्याचा देखभाल खर्चदेखील अत्यंत कमी असतो. त्यात चार्जिंग सुविधांमध्ये वाढ झाल्याने, ग्रामीण भागातही त्यांचा वापर शक्य होत आहे.
advertisement
भारतामधील टॉप 5 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर
1) Sonalika Tiger Electric
बॅटरी: 25.5 kW
पॉवर: 15 HP
लिफ्टिंग क्षमता: 500 किलो
चार्जिंग वेळ: 10 तास (नॉर्मल), 4 तास (फास्ट)
किंमत: 6.40 रु ते 6.72 लाख रु
हा ट्रॅक्टर 75% इंधन खर्चाची बचत करतो आणि देखभाल खर्च जवळपास नाहीच.
2) Autonxt X45H2
बॅटरी: 32 kW
पॉवर: 45 HP
लिफ्टिंग क्षमता: 1800 किलो
चार्जिंग वेळ: 8 तास (नॉर्मल), 2 तास (फास्ट)
किंमत: 16.5 लाख रु
शेतीच्या मशागतीसाठी उत्तम, पॉवर स्टीअरिंग यांसारखी स्मार्ट वैशिष्ट्ये यात आहेत.
3) HAV 45 S1
पॉवर: 44 HP
PTO: 40 HP
लिफ्टिंग क्षमता: 1800 किलो
किंमत: 8.49 लाख रु
GPS आणि रिमोट डायग्नोस्टिक्ससारखी सुविधा यामध्ये मिळते.
3) Cellestial 55 HP
वेग: 30 किमी/तास
लिफ्टिंग क्षमता: 4000 किलो
रेंज: 75 किमी एका चार्जमध्ये
हा ट्रॅक्टर रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि वायरलेस स्टीअरिंगसह उपलब्ध आहे.
4) HAV 50 S1
पॉवर: 48 HP
PTO: 42 HP
लिफ्टिंग क्षमता: 1800 किलो
किंमत: 9.99 लाख रु
हा ट्रॅक्टर दमदार, टिकाऊ आणि कमी खर्चिक आहे.
दरम्यान, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर ही केवळ तांत्रिक क्रांती नसून, शेतकऱ्यांच्या आर्थिक बचतीसाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक महत्त्वाची पायरी ठरत आहे. येत्या काही वर्षांत अशा ट्रॅक्टरचा वापर वाढल्यास भारतातील शेती अधिक शाश्वत आणि प्रगत बनू शकेल.