TRENDING:

शेतकऱ्यांना कृषी विभागाचा अलर्ट! राज्यात 'या' तारखेला अवकळीचा तडाखा बसणार, काय काळजी घ्याल?

Last Updated:

Weather Update : राज्यात सध्या काही भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण तयार झाले असून, ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यात सध्या काही भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण तयार झाले असून, ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. कर्नाटक आणि तेलंगणा सीमेलगतच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील भागांमध्ये या बदलाचा अधिक प्रभाव जाणवू शकतो.
Weather Update
Weather Update
advertisement

अवकाळी कधी बरसणार?

३० ते ३१ मार्चपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये दुपारनंतर ढगांची वाढ होऊन मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आणि जोरदार वाऱ्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात ही स्थिती अधिक ठळकपणे दिसून येण्याची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही हवामानात काही प्रमाणात बदल होण्याचे संकेत आहेत.

या कालावधीत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाबरोबरच काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३१ मार्च रोजीदेखील राज्याच्या काही भागांमध्ये अशाच प्रकारचे वातावरण कायम राहू शकते, त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement

शेतकऱ्यांनी  काय काळजी घ्यावी? 

सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने हवामानातील या बदलाचा थेट परिणाम शेतीवर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा योग्य प्रकारे झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीमुळे उभ्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत आणि स्थानिक हवामान अंदाजावर नियमित लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चवीला एकदम टेस्टी, उन्हाळ्यात बनवा पारंपरिक कैरीचा ठेचा, संपूर्ण रेसिपीचा Video
सर्व पहा

एकूणच, पुढील काही दिवस राज्यात वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता असून, विशेषतः दुपारनंतर हवामानात अचानक बदल होऊ शकतो. त्यामुळे सतर्कता आणि योग्य नियोजन यामुळे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते.

मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांना कृषी विभागाचा अलर्ट! राज्यात 'या' तारखेला अवकळीचा तडाखा बसणार, काय काळजी घ्याल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल