किमान गुंतवणुकीतून मोठा नफा
किसान विकास पत्र योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची सुरुवात केवळ १,००० रुपयांपासून करता येते. यामध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. म्हणजेच, तुम्ही तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार कितीही रक्कम गुंतवू शकता. हे केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर बचत वाढवू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी एक सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक साधन ठरू शकते.
advertisement
दुप्पट परतावा,स्थिर व्याजदरासह
या योजनेतील सर्वात आकर्षक बाब म्हणजे चक्रवाढ व्याजाचा फायदा. सध्या KVP वर वार्षिक ७.५ टक्के व्याजदर लागू आहे. म्हणजेच, जर तुम्ही १ लाख रुपये गुंतवले, तर पहिल्या वर्षाच्या शेवटी तुम्हाला ७,५०० रुपये व्याज मिळेल, जे पुढील वर्षी मूळ रकमेत जोडले जाईल. त्यामुळे पुढील वर्षी व्याज वाढेल आणि त्यावरही व्याज मिळत राहील. या पद्धतीने सुमारे ९ वर्षे आणि ६ महिने म्हणजेच ९.५ वर्षांत तुमची गुंतवणूक दुप्पट होते. उदाहरणार्थ, ५ लाखांची गुंतवणूक १० लाख रुपयांपर्यंत वाढते.
खाते उघडण्याची सोपी प्रक्रिया
किसान विकास पत्र योजनेत कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकते. त्यावर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच, तुम्ही अनेक खाती तुमच्या गरजेनुसार उघडू शकता. तसेच १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावानेही KVP खाते उघडता येते. यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध होतो.
जोखीममुक्त गुंतवणूक, सरकारी हमीसह
किसान विकास पत्र योजना ही पूर्णपणे भारतीय पोस्ट ऑफिस आणि केंद्र सरकारच्या हमीसह चालणारी योजना आहे. त्यामुळे यात भांडवल बुडण्याचा धोका नाही. या योजनेचा उद्देश म्हणजे लोकांना दीर्घकालीन बचतीकडे प्रवृत्त करणे आणि छोट्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळवून देणे हा आहे.