TRENDING:

तुमचा पाणी प्रश्न मिटणार! विहीर खोदण्यासाठी सरकार देतंय 5 लाख रुपये, अर्ज कुठे करायचा?

Last Updated:

Magel Tyala Vihir Yojana : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘मागेल त्याला विहीर’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘मागेल त्याला विहीर’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) या योजनेची अंमलबजावणी केली जात असून पात्र शेतकऱ्यांना शेतात नवीन विहीर खोदण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान जमिनीचे क्षेत्रफळ, विहिरीचा प्रकार, परिसरातील पाण्याची उपलब्धता आणि जलसंधारणाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
Agriculture News
Agriculture News
advertisement

योजनेमागील उद्दिष्ट

या योजनेचा प्रमुख हेतू म्हणजे शेतीसाठी कायमस्वरूपी आणि सहज पाणी उपलब्ध करून देणे. सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा वाढल्याने पीकनुकसानीत घट होईल आणि शेतकऱ्यांना दुष्काळाशी लढण्याची ताकद मिळेल. तसेच, तरुण पिढी शेतीकडे आकर्षित होईल आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कमी प्रमाणात भासेल.

शेतकऱ्यांना होणारे फायदे

विहिरीमुळे शेतकरी बागायती पिके घेऊ शकतील.

advertisement

उत्पादन वाढल्याने उत्पन्नात भर पडेल.

राज्यातील अन्नधान्य उत्पादनात वाढ होईल.

शेतकऱ्यांना सिंचनाचा स्थिर स्त्रोत मिळाल्याने शेतजमीन टिकून राहील आणि रोजगाराच्या संधीही वाढतील.

पात्रता व अटी

अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आणि शेतकरी असावा.

किमान ०.४० हेक्टर शेती असणे आवश्यक आहे.

शेतात आधीपासून विहीर नसावी.

अर्जदार मनरेगा जॉब कार्डधारक असणे आवश्यक आहे.

लाभार्थीचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे.

advertisement

प्रस्तावित जागेपासून ५०० मीटरच्या परिसरात दुसरी विहीर नसावी.

याआधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

आवश्यक कागदपत्रे

आधारकार्ड, राशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, रहिवासी पुरावा, ग्रामसभा ठराव, शेतीचा ७/१२ आणि ८अ उतारा, अर्जदाराचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी, जातीचा दाखला (लागल्यास), नकाशे व खोदकाम परवानगी, तसेच मनरेगा जॉब कार्ड आवश्यक आहे.

advertisement

अर्ज प्रक्रिया

शेतकरी MAHA-EGS Horticulture ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्याचबरोबर ग्रामपंचायतीमार्फत अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. अर्ज सादर झाल्यानंतर तो तालुका स्तरावरील मनरेगा कार्यालयात पाठवला जातो. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पात्र अर्जदारांची निवड केली जाते. निवड पूर्ण झाल्यानंतर विहीर खोदकामासाठी मंजुरी दिली जाते आणि शेतकऱ्यांना निधीचा लाभ मिळतो.

ग्रामीण भागाला दिलासा

advertisement

राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे दुष्काळी भागांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विहिरीमुळे पिकांचे उत्पादन वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पाण्याची समस्या सुटल्याने केवळ शेतीच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा तुटवडा देखील कमी होईल. या योजनेमुळे शेतकरी अधिक आत्मनिर्भर होतील आणि ग्रामीण भागातील जीवनमान उंचावेल.

मराठी बातम्या/कृषी/
तुमचा पाणी प्रश्न मिटणार! विहीर खोदण्यासाठी सरकार देतंय 5 लाख रुपये, अर्ज कुठे करायचा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल