TRENDING:

APMC Market: हळदीला मिळाला उच्चांकी दर, आले आणि डाळिंबाची काय स्थिती? इथं चेक करा

Last Updated:

गुरुवार, दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गुरुवार, दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांचे अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, हळद आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.
advertisement

आल्याच्या आवकेत सुधारणा

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2426 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 872 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 735 क्विंटल आल्यास 6384 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.

आईवडील की कसाई? जन्मलेल्या बाळासोबत असं कोण वागतं? छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार

advertisement

हळदीला दराची झळाळी

राज्याच्या मार्केटमध्ये आज 2556 क्विंटल हळदीची आवक झाली. यापैकी 1656 क्विंटल राजापुरी हळदीची सर्वाधिक आवक सांगली मार्केटमध्ये राहिली. त्यास प्रतीनुसार 12500 ते 20000 रुपये दरम्यान उच्चांकी बाजारभाव मिळाला. तसेच हिंगोली मार्केटमध्ये आवक झालेल्या 900 क्विंटल हळदीस 13300 ते 15800 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.

डाळिंबाच्या दरात चढ-उतार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला मिळाला उच्चांकी दर, आले आणि डाळिंबाची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

आज राज्याच्या मार्केटमध्ये 1460 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 975 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 15000 रुपये दरम्यान दर मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 18 क्विंटल डाळिंबास 4750 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: हळदीला मिळाला उच्चांकी दर, आले आणि डाळिंबाची काय स्थिती? इथं चेक करा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल