advertisement

आईवडील की कसाई? जन्मलेल्या बाळासोबत असं कोण वागतं? छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार

Last Updated:

आईच्या कुशीत सुरक्षित असायला हवे होते, जीवनाचा पहिला श्वास घेणारे निष्पाप बाळ… मात्र नियतीने त्याच्या वाट्याला क्रूर वास्तव दिले.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर : आईच्या कुशीत सुरक्षित असायला हवे होते, जीवनाचा पहिला श्वास घेणारे निष्पाप बाळ… मात्र नियतीने त्याच्या वाट्याला क्रूर वास्तव दिले. सिडको बसस्थानकाजवळील मोकळ्या जागेत जन्मताच एका अर्भकाला निर्दयीपणे फेकून देण्यात आल्याचा अंगावर शहारे आणणारा प्रकार बुधवारी (4 फेब्रुवारी) पहाटे अडीचच्या सुमारास उघडकीस आला. या अर्भकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनंतर सिडको एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सिडको बसस्थानक परिसरात एका मोकळ्या जागेत एक अर्भक बेशुद्ध अवस्थेत पडलेले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. थंडी, अंधार आणि माणुसकीचा अभाव सहन करत ते निष्पाप बाळ एकटेच पडले होते.
advertisement
पोलिसांनी वेळ न दवडता अर्भकाला उपचारासाठी चिकलठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती अर्भकाला मृत घोषित केले. हा निष्कर्ष ऐकताच उपस्थितांचे मन हेलावून गेले.
‎प्राथमिक तपासात, कोणीतरी अज्ञात आई-वडिलांनी जन्म दिलेल्या अर्भकाला उघड्या जागेवर टाकून, कोणतीही काळजी न घेता तेथून निघून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. जन्म देऊनही त्या बाळाच्या श्वासाची, त्याच्या भवितव्याची कोणतीही पर्वा न करता त्याला मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
advertisement
‎या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार साबळे यांनी तक्रार दिली असून, अज्ञात आई-वडिलांविरोधात सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भरत पाचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जन्म घेण्याआधीच संपलेली ही कहाणी समाजाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्या निष्पाप जीवाला जगण्याची संधीही न देणारे ते क्रूर आई-वडील नेमके कोण, याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कसून तपास करत आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
आईवडील की कसाई? जन्मलेल्या बाळासोबत असं कोण वागतं? छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार
Next Article
महाराष्ट्र महसूल विभागाचा मोठा निर्णय, नवे रेडी रेकनर दर जाहीर; बावनकुळेंनी मांडले गणित, घरं महागणार की स्वस्त?
महाराष्ट्र महसूल विभागाचा मोठा निर्णय, नवे रेडी रेकनर दर जाहीर; बावनकुळेंनी मांडले गणित, घरं महागणार की स्वस्त?
  • नव्या आर्थिक वर्षाचे रेडी रेकनर दर फायनल

  • महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

  • महसूल विभागाचे नवे नोटिफिकेशन

View All
advertisement