कापसाचे वधारलेले दर कमी झाले आहेत. कापसाला कमीत कमी 7300 ते जास्तीत जास्त 8088 रुपये दर मिळत आहे. राज्यात सर्वाधिक 3500 क्विंटल कापसाची आवक सावनेर बाजार समितीत झाली, तर 8088 रुपये एवढा सर्वाधिक दर अकोला बोरगाव मंजू बाजार समितीत मिळाला.
हळदीच्या दरात मोठी उलथापालथ, आले आणि डाळिंबाला काय मिळाला आज भाव? Video
advertisement
सोयाबीनच्या दरामध्ये देखील चढ-उतार पाहायला मिळत आहे. मध्यंतरी कमी झालेले सोयाबीनचे दर आता वधारले आहेत. सोयाबीनला सर्वाधिक 6500 प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे, तर सोयाबीनचा कमीत कमी दर 3500 रुपयांपर्यंत आहे. लातूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक 8789 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. राज्यातील सर्वाधिक 6650 रुपयांचा दर वाशिम बाजार समितीमध्ये मिळाला.
तुरीच्या दराने हमीभावाचा पल्ला ओलांडला असून तुरीला 8600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत असल्याचं पाहायला मिळतं. राज्यात सर्वाधिक 7730 क्विंटल तुरीची आवक जालना बाजार समितीमध्ये झाली. करमाळा बाजार समितीमध्ये आलेल्या काळ्या रंगाच्या तुरीला 8801 रुपये एवढा विक्रमी दर मिळाल्याचे पाहायला मिळालं.
कांद्याच्या दरामध्ये दर्जा नुसार मोठी तफावत आढळत आहे. कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटलपासून तब्बल 2800 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे. राज्यातील सर्वाधिक 40,000 क्विंटल कांद्याची आवक सोलापूर बाजार समितीमध्ये झाली. इथे कांद्याला 100 ते 2000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक 2800 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.





