TRENDING:

APMC Market : गुढीपाडव्याला शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच, कांद्याला भाव नाहीच, द्राक्षाला काय मिळाला दर?

Last Updated:

राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक आणि भाव पाहुयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

कांद्याची आवक

राज्याच्या मार्केटमध्ये 53 हजार 376 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 10 हजार 515 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 700 ते 1400 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 35 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1300 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

Weather Alert: महाराष्ट्रावर 24 तास संकटाचे, विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट

advertisement

लिंबूची आवक

राज्याच्या मार्केटमध्ये आज 200 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी पुणे बाजारात आवक झालेल्या 188 क्विंटल लिंबूस 6200 ते 7500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल लिंबूस 11000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

द्राक्ष आवक

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 576 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 555 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 7000 ते 11500 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

advertisement

केळीची आवक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
सर्व पहा

राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 366 क्विंटल केळीची आवक झाली. पुणे बाजारात आवक झालेल्या केळीस प्रतीनुसार 1000 ते 1650 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला.

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market : गुढीपाडव्याला शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच, कांद्याला भाव नाहीच, द्राक्षाला काय मिळाला दर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल