TRENDING:

APMC Market: लिंबाला 10958 रुपये भाव, कांदा आणि केळीला काय मिळाला भाव? इथं चेक करा

Last Updated:

राज्यातील मार्केटमध्ये कृषी मालाची आज मोठ्या प्रमाणात आवक झाली. आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक आणि भाव पाहुयात. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यातील मार्केटमध्ये कृषी मालाची आज मोठ्या प्रमाणात आवक झाली. सोमवार, दिनांक 9 मार्च 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक आणि भाव पाहुयात.
advertisement

कांद्याची आवक

राज्याच्या मार्केटमध्ये 3 लाख 04 हजार 689 क्विटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख 63 हजार 174 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 373 ते 1173 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 2310 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

Weather Alert : 'सूर्या'ची नजर फक्त महाराष्ट्रावर, पारा 'फुटणार', 14 जिल्ह्यांना अलर्ट

advertisement

लिंबूची आवक 

राज्याच्या मार्केटमध्ये आज 710 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 424 क्विंटल लिंबूस 2100 ते 3300 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 82 क्विंटल लिंबूस 10958 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

द्राक्ष आवक 

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 710 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी सोलापूर बाजारात 775 नग आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 80 ते 240 रुपये दरम्यान सर्वात कमी बाजारभाव मिळाला.

advertisement

केळीची आवक 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 295 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात आवक झालेल्या 81 केळीस प्रतीनुसार 2000 ते 6000 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला.

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: लिंबाला 10958 रुपये भाव, कांदा आणि केळीला काय मिळाला भाव? इथं चेक करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल