आल्याच्या दरात सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2252 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 1167 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3600 ते 5200 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच रत्नागिरी मार्केटमध्ये आवक झालेल्या 19 क्विंटल आल्यास 6400 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
द्राक्षाची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 1185 क्विंटल द्राक्षाची आवक राहिली. यापैकी सोलापूर बाजारात आवक झालेल्या 1002 क्विंटल द्राक्षास 120 ते 280 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 881 क्विंटल द्राक्षास प्रतीनुसार 10000 ते 15000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
डाळिंबाच्या आवकेत सुधारणा
आज राज्याच्या मार्केटमध्ये 2609 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी नागपूर बाजारात 1207 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2000 ते 6000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 27 क्विंटल डाळिंबास 13000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.





