फळ बागांचे फायद्याचे वाण
जून - जुलै मध्ये लागवड करण्यासाठी फळ पिकामध्ये आंबा या पिकामध्ये केशर, मोसंबीमध्ये न्यू सेलर, चिंचमध्ये नं.263, शिवाई प्रतिष्ठान, सीताफळामध्ये बालानगर, धारूर सिक्स, पेरू या पिकामध्ये सरदार वाण अतिशय फायदेशीर ठरणार आहे. शेतकऱ्यांनी फळ पिकाची लागवड करत असताना या कलमांच्या निवडीकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. कलमाची निवड करताना एक वर्षाची छोटी कलमे याला जारवा जास्त असतो, त्यामुळे याचा फायदा होतो. फळ पिकांची लागवड करताना दोन-तीन पाऊस झाल्यानंतरच लागवड करावी, असे देखील संजय पाटील यांनी सांगितले आहे.
advertisement
शाश्वत उत्पन्नासाठी माहिती
शाश्वत शेती आणि नफा मिळवण्यासाठी केवळ मेहनतच नव्हे तर योग्य माहिती आणि नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठासारख्या संस्थांकडून सुधारित वाणांची यादी प्रसिद्ध केली जाते. शेतकऱ्यांनी या माहितीचा अभ्यास करून स्थानिक हवामान, जमिनीस अनुरूप वाणांची निवड करावी. फळबाग लागवड ही दीर्घकालीन गुंतवणूक असते. त्यामुळे योग्य वाणांची निवड केल्यास पुढील अनेक वर्ष सातत्याने उत्पन्न घेता येते.





