TRENDING:

AIमध्ये खरच नोकऱ्या आहे की फक्त हवा; एका रिपोर्टने सर्वांचे डोळे उघडले; राज्यातील 2 शहरे आहेत हॉटस्पॉट्स

Last Updated:

AI Jobs: CBRE च्या अहवालानुसार भारतातील जवळपास 70 टक्के AI-संबंधित नोकऱ्या तीन शहरांत केंद्रित आहेत. बेंगळुरू एकट्याच 25.4% वाट्यासह आघाडीवर असून, GCC आणि तंत्रज्ञान गुंतवणुकीचा त्याला मोठा आधार मिळत आहे. तर अन्य दोन शहरांमध्ये...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील नोकऱ्यांचा केंद्रबिंदू कोणता, याचे स्पष्ट चित्र आता समोर आले आहे. प्रॉपर्टी कन्सल्टंट CBRE च्या अहवालानुसार नोकरी डॉट कॉमवरील AI-संबंधित जवळपास 70 टक्के जागा या फक्त तीन शहरांत केंद्रित आहेत आणि ही तीन शहरे म्हणजे बेंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई होय.
News18
News18
advertisement

हा निष्कर्ष डिसेंबर 2025 पर्यंत नोकरी डॉट कॉमवर उपलब्ध असलेल्या 64,500 हून अधिक सक्रिय जॉब लिस्टिंगच्या आधारे काढण्यात आला आहे. या डेटामध्ये विशेषतः ‘AI’ टॅग असलेल्या पदांचा समावेश करण्यात आला होता.

बेंगळुरू आघाडीवर

तंत्रज्ञानाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये एकट्याच 25.4% AI नोकऱ्या आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली-एनसीआर (24.8%) आणि मुंबई (19.2%) यांचा क्रम लागतो. या तिन्ही शहरांत मिळून देशातील बहुतांश AI भरती होत असल्याचे अहवालात नमूद आहे.

advertisement

CBRE ने स्पष्ट केले आहे की हा डेटा भारतातील सर्व AI नोकऱ्यांचे प्रतिनिधित्व करत नाही, मात्र प्रमुख क्षेत्रांतील भरतीचा कल यातून स्पष्ट दिसतो.

इतर शहरांची स्थिती

हैदराबादमध्ये AI-संबंधित नोकऱ्यांचा वाटा 12.5% आहे. पुणे (9.6%), चेन्नई (6.4%) आणि कोलकाता (2.1%) या शहरांतही मागणी आहे. मात्र ती तुलनेने कमी आहे.

कोणत्या क्षेत्रांत सर्वाधिक संधी?

advertisement

सध्या AI भूमिका प्रामुख्याने तीन प्रमुख क्षेत्रांत दिसतात:

इंजिनिअरिंग (सॉफ्टवेअर आणि क्वालिटी अॅश्युरन्स)

डेटा सायन्स आणि अॅनालिटिक्स

कस्टमर सक्सेस, सर्व्हिस आणि ऑपरेशन्स

या तिन्ही क्षेत्रांत AI चा वापर वेगाने वाढत आहे आणि त्यानुसार भरतीही वाढताना दिसते.

‘AI आता चर्चेपुरते मर्यादित नाही’

CBRE चे चेअरमन आणि CEO अंशुमान मॅगजीन यांच्या मते, AI आता केवळ ट्रेंड किंवा चर्चेचा विषय राहिलेला नाही. भारताच्या व्यापक आर्थिक आणि पायाभूत विकासकथेत AI महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जागतिक कंपन्या भारताकडे केवळ सर्व्हिस डिलिव्हरीसाठी नव्हे, तर एंड-टू-एंड इनोव्हेशन हब म्हणून पाहू लागल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.

advertisement

यामुळे भारताचे जागतिक डिजिटल व्हॅल्यू चेनमधील स्थान अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बेंगळुरूतील GCCचा प्रभाव

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
4 दिवस होते मुक्कामी,शिवाजी महाराजांनी अखेरची लूट केली जालन्यात,इतिहास माहितीये?
सर्व पहा

बेंगळुरूमधील AI भरतीत वाढ होण्यामागे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC) ची मोठी भूमिका आहे. 2025 मध्ये देशातील एकूण ऑफिस स्पेस लीजिंगपैकी एक-तृतीयांशहून अधिक व्यवहार बेंगळुरूमध्ये GCC कडून झाले. दिल्ली-एनसीआरमध्ये कन्सल्टिंग, फिनटेक, हेल्थकेअर आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमुळे AI तज्ज्ञांची मागणी मजबूत आहे.

advertisement

मराठी बातम्या/AI/
AIमध्ये खरच नोकऱ्या आहे की फक्त हवा; एका रिपोर्टने सर्वांचे डोळे उघडले; राज्यातील 2 शहरे आहेत हॉटस्पॉट्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल