आता 20 जानेवारी रोजी न्यायाधीश शनि आपल्या उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे उत्तराभाद्रपद हे शनीचे स्वतःचे नक्षत्र असल्याने या परिवर्तनाचे परिणाम अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आत्मविश्वास आणि मानसिक समाधान यामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येऊ शकते. काहींना नवीन नोकरी, पदोन्नती किंवा मोठा आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना शनीच्या या नक्षत्र परिवर्तनाचा विशेष लाभ होणार आहे.
advertisement
मकर
मकर राशीसाठी शनीचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. शनि तुमच्या राशीतून तिसऱ्या भावात प्रवेश करत असल्याने धैर्य, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढेल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. रखडलेली कामे पुन्हा वेग घेतील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. या काळात तुम्ही धाडसी निर्णय घेऊ शकता आणि ते निर्णय यशस्वी ठरतील. परदेशाशी संबंधित कामे, व्यवहार किंवा प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल आणि सामाजिक वर्तुळात तुमचा प्रभाव वाढेल.
कर्क
कर्क राशीसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन भाग्यवर्धक ठरू शकते. शनि तुमच्या राशीतून नवव्या म्हणजेच भाग्यस्थानातून प्रवास करत असल्याने नशिबाची साथ मिळेल. या काळात धार्मिक, आध्यात्मिक किंवा शुभ कार्यात सहभाग वाढू शकतो. देश-विदेश प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल आणि मान-सन्मानात वाढ होईल. जीवनात स्थैर्य, सकारात्मकता आणि स्पष्टता येईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक असून परीक्षांमध्ये चांगले यश मिळू शकते. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मिथुन
मिथुन राशीसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. शनि कर्मस्थानातून प्रवास करत असल्याने कामातील मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, जबाबदारीत वाढ किंवा पगारवाढ मिळू शकते. व्यवसायिकांसाठी विस्तार आणि नफा वाढण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. वडिलांशी संबंध अधिक दृढ होतील आणि कौटुंबिक मालमत्तेतून लाभ संभवतो. तेल, खनिजे, पेट्रोल, लोखंड किंवा काळ्या वस्तूंशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष फायदा होऊ शकतो.
(सदर बातमी फक्त महितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
