TRENDING:

याला म्हणतात नशीब! कार्तिक अमावस्या संपताच 5 राशींचा सुवर्णकाळ झाला सुरू, जीवनात आनंदी आनंद येणार

Last Updated:

Budhaditya Yog : आज कार्तिक अमावस्या आणि गुरुवारचा शुभ संयोग असल्याने दिवस विशेष मानला जात आहे. पंचांगानुसार अमावस्या तिथी दुपारी 12.17 वाजेपर्यंतच होती. अमावस्या संपताच 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आज कार्तिक अमावस्या आणि गुरुवारचा शुभ संयोग असल्याने दिवस विशेष मानला जात आहे. पंचांगानुसार अमावस्या तिथी दुपारी 12.17 वाजेपर्यंत होती. याचबरोबर विशाखा आणि अनुराधा नक्षत्राचा प्रभाव राहणार आहे. शोभन योग व सर्वार्थ सिद्धी योग असे शुभ योगही या दिवशी निर्माण होत असल्याने अनेक राशींना त्याचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे सूर्य आणि बुध ग्रहाची युती होत असल्याने बुधादित्य योगाची निर्मिती होईल. हा योग बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता आणि आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या योगामुळे काही राशींवर खास कृपा होणार आहे.
astrology news
astrology news
advertisement

मेष : राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. वाढलेला आत्मविश्वास तुमच्या कामकाजात वेग आणेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा दिवस अनुकूल आहे. मात्र, घाईघाईत मोठे निर्णय टाळण्याचा सल्ला ज्योतिष तज्ज्ञ देत आहेत. मित्रांकडून मिळणारे सहकार्य तुमची अनेक अडचण सोडवेल. कामाच्या क्षेत्रातही तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल.

वृषभ : राशीच्या व्यक्तींना आज मानसिक शांती मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळून अनेक कामे सुटसुटीतपणे पार पडतील. घरगुती वातावरण आनंदी राहील आणि प्रेम जीवनात गोडवा वाढेल. वाणीतील गोडव्यामुळे नवे संबंध प्रस्थापित होण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीही स्थिर राहील.

advertisement

कर्क : राशीच्या व्यक्तींना आजच्या दिवशी मनापासून केलेल्या प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. मित्र-परिवारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन होऊ शकतो. आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांकडून एखादी शुभवार्ता मिळण्याचा योगही आज आहे, त्यामुळे दिवस सकारात्मक जाईल.

सिंह : राशीला आज उत्साह आणि सकारात्मकतेचा अनुभव मिळेल. सरकारी योजनांचा उपयोग करून घेण्यासाठी हा दिवस चांगला आहे. धार्मिक कार्यात मन रमेल. मात्र आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कामाच्या निमित्ताने प्रवासाची शक्यता असून त्यातून फायदेशीर अनुभव मिळू शकतात. आर्थिक स्थितीही सुधारेल.

advertisement

कुंभ : राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कार्यस्थळी वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. नव्या कलात्मक गोष्टी, प्रकल्प किंवा छंदांना सुरुवात करण्यासाठी हा दिवस अनुकूल आहे. वाणीतील मधुरता संबंध अधिक दृढ करेल. व्यवसायातही काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची कमाल, पल्सरच्या इंजिनपासून बनवली रेसिंग कार्ट
सर्व पहा

(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
याला म्हणतात नशीब! कार्तिक अमावस्या संपताच 5 राशींचा सुवर्णकाळ झाला सुरू, जीवनात आनंदी आनंद येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल