TRENDING:

अरे देवा! मार्चच्या पहिल्याच आठवड्यात येणार संकटं, होळी अन् चंद्रग्रहणाचा या राशींवर होणार परिणाम

Last Updated:

Astrology News : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मार्च २०२६ हा महिना अत्यंत निर्णायक मानला जात आहे. या कालावधीत एकाच वेळी अनेक ग्रहांची हालचाल, नक्षत्रबदल आणि विशेषतः पूर्ण चंद्रग्रहणाचा योग येत असल्याने त्याचा प्रभाव सर्व राशींवर जाणवणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मार्च २०२६ हा महिना अत्यंत निर्णायक मानला जात आहे. या कालावधीत एकाच वेळी अनेक ग्रहांची हालचाल, नक्षत्रबदल आणि विशेषतः पूर्ण चंद्रग्रहणाचा योग येत असल्याने त्याचा प्रभाव सर्व राशींवर जाणवणार आहे. वैदिक पंचांगानुसार ३ मार्च रोजी होलिका दहनाच्या दिवशी पूर्ण चंद्रग्रहण होणार असून हे ग्रहण भारतासह अनेक देशांमध्ये स्पष्टपणे दिसणार आहे. ग्रहण भारतात दिसणार असल्याने सुतक काळ लागू होईल आणि धार्मिक तसेच शुभ कार्यांवर त्याचा परिणाम होईल, असे जाणकार सांगतात.
Astrology News
Astrology News
advertisement

होळीच्या दिवशी दुर्मीळ चंद्रग्रहण

ज्योतिष अभ्यासकांच्या मते, ३ मार्च २०२६ रोजी होणारे हे पूर्ण चंद्रग्रहण सिंह राशीत आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे. सुमारे ३ तास २७ मिनिटे चालणारे हे ग्रहण भारत, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया तसेच पॅसिफिक महासागर परिसरातील अनेक भागांत पाहता येईल. ग्रहणाच्या सुमारे नऊ तास आधी सुतक काळ सुरू होणार असल्याने त्या काळात पूजा, गृहप्रवेश, विवाहाशी संबंधित विधी, नवीन व्यवसाय किंवा महत्त्वाचे निर्णय टाळण्याचा सल्ला देण्यात येतो. विशेषतः गर्भवती महिलांनी या काळात अतिरिक्त काळजी घ्यावी, असेही सांगितले जाते.

advertisement

काही राशींना अधिक सावध राहण्याचा इशारा

या चंद्रग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर जाणवेल, मात्र ज्योतिषशास्त्रानुसार तीन राशींना या काळात विशेष आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक चढ-उतार, मानसिक ताण, आरोग्यविषयक समस्या आणि करिअरमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मोठी गुंतवणूक, महत्त्वाचे करार किंवा भावनिक निर्णय घेण्याआधी नीट विचार करण्याचा सल्ला दिला जातो. ध्यान, जप, सकारात्मक विचार आणि संयम यामुळे नकारात्मक परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतात.

advertisement

सिंह राशी

या ग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव सिंह राशीवर होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होणे, मन अस्वस्थ राहणे आणि कामाच्या ठिकाणी विरोधक वाढणे असे अनुभव येऊ शकतात. वरिष्ठांशी मतभेद, अपेक्षित यश न मिळणे आणि मेहनतीचे योग्य फळ न मिळाल्याची भावना मनात राहू शकते. आर्थिक बाबतीत अनपेक्षित खर्च वाढू शकतात, तसेच गुंतवणुकीत तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहू शकते आणि वैवाहिक नात्यात दुरावा जाणवू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, थकवा यांसारख्या तक्रारी संभवतात. घाईगडबडीत घेतलेले निर्णय पुढील काळात अडचणी वाढवू शकतात.

advertisement

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीसाठी हा काळ आर्थिक तणाव आणि मानसिक अस्वस्थता वाढवणारा ठरू शकतो. अडकलेले पैसे, कर्ज परतफेडीतील अडचणी आणि व्यवसायातील तोटा यामुळे चिंता वाढू शकते. नोकरीत अस्थिरता जाणवू शकते, तसेच सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. लपलेले विरोधक सक्रिय होऊ शकतात, ज्यामुळे कामात अडथळे येऊ शकतात. नातेसंबंधांमध्ये गैरसमज वाढू शकतात. आरोग्याच्या बाबतीत पोटाशी संबंधित त्रास, रक्तदाब किंवा तणावजन्य समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे. संयम आणि दूरदृष्टी ठेवल्यास या काळातील अडचणींवर मात करणे शक्य होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहतूक कोंडीतून होणार सुटका, पुणे पोलिसांची ट्रॅफिकक्युअर प्रणाली काय? Video
सर्व पहा

(सदर बातमी फक्त महितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही) 

मराठी बातम्या/राशीभविष्य/
अरे देवा! मार्चच्या पहिल्याच आठवड्यात येणार संकटं, होळी अन् चंद्रग्रहणाचा या राशींवर होणार परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल