आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच छान आहे. तुम्हाला वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायाशी संबंधित काही नवीन प्रस्ताव समोर येतील आणि सरकारी कामातही प्रगती होईल. दिवसभर उत्साही वाटेल, पण बोलताना आणि रागावर नियंत्रण ठेवा. पचनाच्या काही तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे सूर्याला अर्घ्य देणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
मूलांक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)
advertisement
तुमच्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. आई-वडिलांची चांगली साथ मिळेल. समाजात तुमचं नाव होईल आणि मानसन्मान मिळण्याचे योग आहेत. आर्थिक लाभ होण्याचीही दाट शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदाराशी प्रेमळ वागणं तुमच्या फायद्याचं ठरेल.
मूलांक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले लोक)
भावंडांशी तुमचं बाँडिंग आज चांगलं राहील, ज्यामुळे मनाला आनंद मिळेल. एखाद्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत तुम्ही अडकल्यासारखं वाटेल, पण तुमच्या मुत्सद्दीपणाने तुम्ही विरोधकांना शांत करू शकाल. नोकरीची एखादी नवीन आणि चांगली संधी तुमच्याकडे चालून येईल. पार्टनरसोबत सुरू असलेले वाद आता मिटवण्याची वेळ आली आहे. तुमचा लकी नंबर 3 असून मरून रंग तुमच्यासाठी शुभ आहे.
मूलांक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)
तुमच्यासाठी आजचा दिवस फारसा चांगला दिसत नाही. सरकारी कामात एखादी नोटीस किंवा अडथळा येऊ शकतो. वडिलांच्या तब्येतीची चिंता सतावेल. पैशांच्या बाबतीतही काही अडचणी येतील, ज्यामुळे थोडा मानभंग होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी चांगलं वागणं आज तुमच्यासाठी गरजेचं आहे.
मूलांक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेले लोक)
आज तुमची बऱ्याच काळापासूनची नियोजित कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा काळ चांगला आहे. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा, कारण पैसे अडकण्याची भीती आहे. बहीण किंवा मुलीचा सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास ती फायदेशीर ठरेल.
चंद्रग्रहणाचा सूतक काळ लागणार, कोणाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारापूर्वी न चुकता
मूलांक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)
तुमचा आजचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. भांडण-तंट्यापासून लांब राहिलंच बरं, नाहीतर विनाकारण डोकं शांत राहणार नाही. घरातही काही विषयांवरून चर्चा किंवा वाद होऊ शकतात. वडील, बहीण आणि मुलीशी संबंध चांगले ठेवा आणि कोणताही मोठा निर्णय त्यांच्याशी बोलूनच घ्या.
मूलांक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेले लोक)
तुमच्या जुन्या समस्या आज सुटताना दिसतील, पण वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज खर्च वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थोडा ताण येईल. मुलाच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्या. घरात कोणाशीही कठोर बोलू नका, नाहीतर तुमच्यावर बोट उचललं जाऊ शकतं.
मूलांक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेले लोक)
मूलांक 8 च्या लोकांसाठी आजचा काळ थोडा कठीण आहे. प्रत्येक कामात अडथळे आणि त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. मानसिक शांततेसाठी सूर्याला जल अर्पण करा आणि शनिदेवाची उपासना करा. हृदयाचे ठोके वाढल्यासारखं वाटल्यास किंवा अस्वस्थ वाटल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा. आज रागावर नियंत्रण ठेवा आणि मौन पाळणे तुमच्या हिताचे राहील.
योग्य वेळी योग्य गोष्टी मिळतात; अंगावर अशा ठिकाणी तीळ म्हणजे नशिबाची प्रचंड साथ
मूलांक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक)
नशीब आज पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. तुमची ठरवलेली सर्व कामं आज पूर्ण होतील. पैसा आणि आरोग्याच्या बाबतीत जे अडथळे होते, ते आता कमी होतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस आनंदाचा जाईल. आई-वडील आणि मुलांकडून तुम्हाला पूर्ण प्रेम आणि सहकार्य मिळेल.
