सूर्यग्रहणाची वेळ आणि स्वरूप
21 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता हे आंशिक सूर्यग्रहण सुरू होईल आणि 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3.24 वाजता संपेल. हे ग्रहण भारतात न दिसल्यामुळे सुतक काळ लागू होणार नाही. तरीदेखील ग्रहणाचा राशींवर प्रभाव होईल, असे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.
सूर्यग्रहण कुठे दिसणार?
भारतामध्ये हे ग्रहण न दिसले तरी जगातील काही भागांतून ते दिसणार आहे. न्यूझीलंड, फिजी, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका तसेच पॅसिफिक आणि अटलांटिक महासागराच्या काही भागातून हे सूर्यग्रहण पाहता येणार आहे.
advertisement
कोणत्या राशींवर परिणाम?
या सूर्यग्रहणाचा प्रभाव कन्या राशीत आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होणार आहे. त्यामुळे सर्व राशींवर त्याचा काही ना काही परिणाम होईल. विशेषतः पाच राशींवर या घटनेचा ठसा अधिक गडद राहील.
अशुभ परिणाम होणाऱ्या राशी
मिथुन : करिअरमध्ये अडचणी, वैयक्तिक जीवनात तणाव आणि आरोग्याशी संबंधित त्रास जाणवू शकतो.
कन्या : या राशीतच सूर्यग्रहण होत असल्याने कन्या राशीच्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. अनावश्यक वाद टाळा, मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहा आणि मानसिक तणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.
मीन : नातेसंबंध आणि आर्थिक क्षेत्रात अस्थिरता येऊ शकते. आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल.
शुभ परिणाम होणाऱ्या राशी
वृषभ : आर्थिक दृष्ट्या लाभदायक काळ. नवी संधी मिळू शकते आणि करिअरमध्ये प्रगती होईल.
तूळ : नोकरी व व्यवसायात उन्नतीची शक्यता. पैशांची वाढ होईल आणि महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतील.
ग्रहणाचा संदेश
सप्टेंबर महिन्यात अवघ्या 15 दिवसांत दोन मोठी ग्रहणे होत आहेत. या काळात प्रत्येक राशीने आपले दैनंदिन जीवन संयमाने जगणे आवश्यक आहे. काही राशींना आव्हाने पेलावी लागणार असली तरी इतरांना नवी दारे उघडण्याची संधी मिळणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहण हे फक्त आकाशीय घटना नसून जीवनातील बदलांचा संकेत देणारे असते. त्यामुळे हे ग्रहण नकारात्मक किंवा सकारात्मक अनुभव देईल का, हे प्रत्येक व्यक्तीच्या जन्मपत्रिकेवर अवलंबून असणार आहे. मात्र, ज्यांना या काळात अडचणी जाणवतील त्यांनी शांत राहून योग्य निर्णय घेणे, अनावश्यक धोके टाळणे आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)