रेवती नक्षत्राची मुख्य वैशिष्ट्ये - या नक्षत्रावर जन्मलेले लोक मृदुभाषी आणि व्यवहारात अत्यंत संतुलित असतात. कोणत्याही परिस्थितीचे आकलन करून ती हाताळण्यात हे लोक माहीर असतात. ते नेहमी आपल्या विवेकबुद्धीने आणि अंतरात्म्याच्या आवाजावर आधारित निर्णय घेतात. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते, ज्यामुळे ते गर्दीतही उठून दिसतात. धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांवर त्यांची गाढ श्रद्धा असते. कुटुंब आणि सामाजिक जीवनात शांतता आणि सहानुभूती टिकवून ठेवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.
advertisement
सिंह कन्या तूळ वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; आनंदी वार्ता कोणाला? महिनाखेरीस
गुण आणि स्वभाव - रेवती नक्षत्राचे लोक इतरांची काळजी घेणारे, विनम्र आणि स्वावलंबी असतात. ते समाजात लोकप्रिय असून त्यांच्यात कलात्मक गुण आणि धाडस उपजत असते. इतरांना योग्य सल्ला देण्याच्या बाबतीत त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात.
या नक्षत्रावर जन्मलेले पुरुष विश्वासार्ह, सभ्य, कोमल मनाचे आणि प्रामाणिक असतात. ते कामाचे ठिकाण आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये उत्तम ताळमेळ राखतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. ते कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतात. मात्र, कधीकधी अपयशाला सामोरे जाताना त्यांना लवकर नैराश्य येऊ शकते.
महिला कशा असतात - रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या महिला कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी इतरांशी मिळूनमिसळून राहतात. त्यांची धार्मिक आणि आध्यात्मिक विषयांत खोलवर रुची असते. कधीकधी त्यांच्या स्वभावात अंधश्रद्धेची झलक पाहायला मिळते. त्या स्वभावाने अत्यंत शांत आणि सौम्य असून सामाजिक संबंध टिकवून ठेवण्यात यशस्वी होतात.
मेष वृषभ मिथुन कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; शेवटचा आठवडा कसा? मेहनत फळास पण..
शिक्षण आणि व्यवसाय - या नक्षत्राचे लोक आपल्या उपजत बुद्धीने संधी ओळखण्यात पटाईत असतात. कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जाण्याची आणि आपले ध्येय गाठण्याची त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते. शिक्षणात त्यांना कला आणि गणित या विषयांत चांगले यश मिळू शकते. जनसंपर्क, शिक्षक, राजकारण, अभिनय, प्रशासन, फ्लाइट अटेंडंट, ट्रॅव्हल एजंट किंवा पत्रकारिता या क्षेत्रांत ते आपले करिअर यशस्वीपणे करू शकतात.
कौटुंबिक जीवन आणि आरोग्य -
पुरुषांना कुटुंबाकडून थेट लाभ मिळण्याचे प्रमाण कमी असले तरी त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखी असते. महिलांना त्यांच्या पतीकडून पूर्ण सहकार्य मिळते, ज्यामुळे त्यांचे नाते मधुर राहते. सासरच्या मंडळींशी होणारे छोटे-मोठे वाद लवकर मिटतात. आरोग्याच्या बाबतीत पुरुषांना पोट, ताप, दात आणि कानाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, तर महिलांना कान आणि पोटाच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतात.
